होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुरणपोळीची चव कधी चाखता येईल याची तुम्ही नक्कीच वाट पाहत असाल. आज आम्ही तुम्हाला होळीच्या सणाला आणि रंगांना असलेल्या विषेश महत्वाबाबत सांगणार आहोत. एक्सपर्टसच्यामते रंगपंचमी खेळत असतान केल्या जात असलेल्या रंगाच्या वापरामुळे शरीराला अनेक फायदे मिळत असतात. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.
होळीसाठी वापरले जाणारे वेगवेगळे रंग शरीरातील आजार दूर करण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. इतकंच नाही तर इजिप्त आणि चीनमध्ये या रंगाचा वापर आजार बरा करण्यासाठी अनेक वर्षांपासून केला जातो. आज आम्ही तुम्हाला होळीसाठी वापरल्या जात असलेल्या वेगवेगळ्या रंगाचे शरीरावर कसे सकरात्मक परिणाम घडून येतात. याबाबत सांगणार आहोत.
(Image credit- lonely planet)
लाल रंग
(image credit- india.com)
लाल रंग शरीराच्या अवयावरांवरिल समस्येसाठी उपाय म्हणून गुणकारक मानला जातो. यामुळे एड्रिनेलिन हार्मेोनला चालना मिळत असते. विकनेस आणि एनिमिया आणि रक्ताच्या संबंधित आजार बरे होण्यासाठी लाल रंग फायदेशीर ठरत असतो. त्यामुळे डोळयांना शांतता जाणवत असते. रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.
पिवळा रंग
हा रंग मानसिकरित्या उत्तेजन देणारा असतो. त्यामुळे नर्वस सिस्टीम स्ट्राँग होत असते. त्वचेसह मासपेशींना सुद्धा बळकटी मिळत असते. याशिवाय पोट खराब झाल्यानंतर किंवा त्वचेवरील खाज- खुजलीपासून आराम मिळण्यासाठी हा रंग फायदेशीर ठरत असतो.
निळा रंग
(image credit- little passport)
या रंगाला शांततेचे प्रतिक मानलं जातं. उच्च रक्तदाबाला कमी करण्यासाठी या रंगाचा मोठा वाटा आहे. या रंगाचा वापर कलर थेरेपीत करून डोकेदुखी, डोक्याची सुद आणि सर्दी, खोकला या समस्यांपासून सुटका मिळवता येते. (हे पण वाचा- फक्त ७ दिवस दुधासोबत सुंठाचं सेवन कराल तर 'हे' आजार कधी दूर होतील कळणार सुद्धा नाही)
केशरी रंग
(image credit- dream holi festival)
हा रंग उत्साह वाढवून अस्थमा, ब्रॉन्काइटिस आणि किडमी इनफेक्शन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असतो. या रंगामुळे उत्साह वाढून फुप्पुसांचे आजार सुद्धा बरे होतात. अनेक ठिकाणी औषधं आणि गोळ्यांव्यतिरिक्त आजार बरे करण्यासाठी या कलर थेरेपीचा वापर करून उपचार केले जातात. तु्म्ही सुद्धा या होळीला रंगासोबत खेळून आनंदी आणि निरोगी राहू शकता. ( हे पण वाचा- जेवणाबाबत फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवाल तर डाएटची झंझट न ठेवता झटपट बारिक व्हाल...)