(Image Credit : goeventz.com)
होळीचा सण म्हणजे, मजा-मस्ती आणि रंगांची उधळण. परंतु डायबिटीजने त्रस्त असणाऱ्या व्यक्ती भितीपोटी हा सण व्यवस्थित साजरा करत नाहीत. होळीमध्ये रंग खेळण्याव्यतिरिक्त अनेक नवनवीन पदार्थांची मेजवानीदेखील असते. अशातच डायबिटीजने ग्रस्त असणाऱ्या लोकांना या पदार्थांपासूनही दूर रहावं लागतं. होळीच्या सण उत्साहात साजरा करण्यासाठी डायबिटीजने ग्रस्त लोकांना आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.
डायबिटीजचे रूग्ण आणि गोड पदार्थ
होळीच्या रंगामध्ये रंगल्यानंतर लोक एकमेकांच्या घरी गोड पदार्थ खाण्यासाठी जातात. परंतु जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही या आनंदापासून दूर राहावं लागतं. होळीच्या सणासाठी तुम्हालाही पुरण पोळी, थंडाईचा आस्वाद घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त लक्ष द्या की, तुम्ही जास्त कॅलरी घेत तर नाही ना? किंवा तुम्ही डाएटमध्य काही त्रास देणारे दार्थ तर नाहीत ना? उदाहरणार्थ डायबिटीजच्या रूग्णांनी एक गुजिया खाल्ली तर त्यांनी आपल्या डाएटमधून तेवढ्याच कॅलरीचे पदार्थ किंवा इतर कार्ब्स असणारे पदार्थ काढून टाकावेत.
ड्रायफ्रुट्स असणाऱ्या मिठायांचे सेवन करा
डायबिटीज रूग्णांसाठी सर्वात जास्त टेन्शन असतं की, ते गोड पदार्थ खाऊ शकत नाहीत. पण डायबिटीजचे रूग्ण या दिवसांमध्ये गोड पदार्थ खाऊ शकतात. फक्त त्यांना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ज्या मिठायांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्सचा वापर करण्यात आला असेल त्यांचाच आहारामध्ये समावेश करा. डायबिटीज रूग्णांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, बाजारात मिळणाऱ्या शुगर फ्री मिठायांवर अजिबात विश्वास ठेवू नका. खरं तर याऐवजी घरीच तयार केलेल्या गोड पदार्थांना प्राधान्य द्यावं.
डायबिटीज रूग्णांसाठी पेय पदार्थ
डायबिटीज रूग्णांनी खाण्यासोबतच पेय पदार्थांबाबतही काळजी घेणं गरजेचं असतं. डायबिटीजचे रूग्ण सामान्य लोकांप्रमाणे गोड पेय पदार्थ पिऊ शकत नाहीत. डायबिटीज रूग्णांना होळीचा सण एन्जॉय करण्यासोबतच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. डायबिटीजच्या रूग्णांसाठी होळीमध्ये गोड पेय पदार्थांऐवजी लस्सी किंवा इतर कमी गोड असणाऱ्या पेय पदार्थांचा समावेश करावा.
त्वचेची काळजी अशी घ्या
डायबिटीजच्या रूग्ण असो किंवा सामान्य लोकं सर्वांना होळीच्या रंगांपासून त्वचेचं रक्षण करण्याची गरज असते. होळीच्या रंगापासून बचाव करण्यासाठी डायबिटीज रूग्णांनी केमिकल्सच्या रंगांपासून दूरच रहावं. केमिकलयुक्त रंगांमुळे डायबिटीजच्या रूग्णांना अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक रंग किंवा ऑर्गॅनिक रंगांचा वापर करणं फायदेशीर ठरतं.