होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तुम्हीही होळीसाठी खास तयारी करत असालचं... होळी म्हणजे रंगाची उधळण करणारा सण. मग तुम्ही या दिवसाला आणखी रंगीबेरंगी करण्यासाठी रंग खरेदी केले की नाही? काय सांगता अजून रंग खरेदी केले नाहीत. काही हरकत नाही. बाजारामध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त रंगांपेक्षा तुम्ही काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुमच्या आवडीचे रंग घरीच तयार करू शकता.
होळीसाठी बाजारामध्ये जे रंग उपलब्ध असतात. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्स असतात. असे रंग त्वचेसोबतच आरोग्यासाठीही धोकादायक ठरतात. त्याऐवजी जर गरच्या घरीच रंग तयार करून त्याने होळी खेळलात तर आरोग्य जपण्यास मदत होईल. तुम्ही घरी रंग तयार करण्याचा विचार करत असाल तर घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंच्या मदतीने नैसर्गिक पद्धतीने रंग तयार करू शकता. हे रंग त्वचेला नुकसान पोहचवण्याऐवजी फायदाच पोहोचवतात.
घरीच तयार करा नैसर्गिक रंग :
1. पिवळा रंग
बेसन आणि हळद दोन्ही एकत्र करून घ्या. हे एकत्र केल्यानंतर तुम्हाला सुकलेला पिवळा रंग मिळण्यास मदत होईल. हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हळदीमध्ये अन्टीसेफ्टिक गुणधर्म आढळून येतात. तर बेसन चेहरा स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला गरज असेल तर झेंडूची फुल पाण्यामध्ये उकळून पिवळा रंग तयार करू शकता.
2. गुलाबी रंग
गुलाबी रंग जास्तीत जास्त मुलींना जास्त आवडतो. गुलाबी रंग तयार करण्यासाठी तुम्ही बीटाचा वापर करू शकता. त्यासाठी बीटाची मुळं किंवा बीट पाण्यामध्ये उकळून घ्या, त्यानंतर ते गाळून त्यामध्ये दूध एकत्र करा.
3. नारंगी रंग
नारंगी रंग तयार करण्यासाठी तुम्ही केशर पाण्यामध्ये एकत्र करून रात्रभरासाठी तसचं ठेवा. लगेच नारंगी रंग तयार करायचा असेल तर केशर पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या. जेव्हा पाणी थंड होइल त्याचा वापर रंग म्हणून करा.
4 ब्राउन कलर
कॉफी पावडरचा वापर करून ब्राउन रंग तयार करून शकता किंवा चहा पावडर पाण्यामध्ये उकळूनही तुम्ही ब्राउन रंग तयार करू शकता. पण लक्षात ठेवा हा रंग जात नाही. तुम्ही हा रंग तयार करण्यासाठी मुलतानी मातीचाही वापर करू शकता.
5. हिरवा रंग
हिरवा रंग तयार करण्यासाठी तुम्ही हलदीमध्ये नीळ एकत्र करू शकता. याव्यतिरिक्त पालक, धने, पुदिना, टॉमेटो किंवा कडुलिंबाची पानं वाटून पाण्यामध्ये एकत्र करा. तुम्ही हे कोरड्या रंगाच्या रूपामध्येही वापरू शकता.
6. निळा रंग
निळीचा वापर करून निळा रंग तयार करता येतो.
7. लाल रंग
कोरडा लाल रंग तयार करण्यासाठी लाल जास्वंदाच्या फूलाचा वापर करू शकता. त्यासाठी जास्वंदाच्य फूलाची पावडर पिठासोबत एकत्र करून तयार करा. त्याऐवजी गाजराला पाण्यामध्ये उकळून लाल रंग तयार करू शकता.