आजच्या लाइफस्टाइलमुळे अनेकजण शरीराला आवश्यक अशा आहार सेवन करत नाहीत. त्यामुळे शरीराला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही आहारात योग्य पदार्थांदा समावेश करणे गरजेचे असते. पण याची काळजी न घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि सहज वेगवेगळ्या समस्या होताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती काढा सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मजबूत होते.
हर्बल काढा करण्यासाठी साहित्य
दोन छोट्या वेलची
२-३ दाणे काळे मिरे
२ छोटे तुकडे दालचीनी
८ ते १० तुळशीची पाने
एक छोटा तुकडा आले
एक छोटा चमचा मध
कसा कराल तयार काढा?
सर्वातआधी एका भांड्यात दीड ग्लास पाणी घ्या आणि ते उलळायला ठेवा.
काळे मिरे बारीक करा आणि वेलचीचे दाणे काढून घ्या.
आल्याचे तुकडेही बारीक करुन घ्या.
तुळशीची पाने चांगली धुवून घ्या.
पाणी उकळल्यावर त्यात मध टाकून वरील सर्व पदार्थ टाका.
७ ते ८ मिनिटे कमी आसेवर हे उकळू द्या.
आता गॅस बंद करा आणि काढा एका ग्लासमध्ये गाळून घ्या.
यात एक छोटा चमचा मध घालून सेवन करा.
काय आहेत या काढ्याच्या फायदे
हा काढा तयार करण्यासाठी सोपा आहे कारण हा तयार करण्यासाठी किचनमध्ये आधीच हे सर्व पदार्थ असतात. हा काढा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार फायदेशीर आहे. याने वेगवेगळ्या आजारांपासून तुमचा बचाव होतो. वेलचीमध्ये असणारं तेल पचनक्रिया चांगली ठेवतं. तर दालचीनीमध्ये असणारे यूजेनाल आणि सिनेमेल्डीहायड वेदना कमी करतं. त्यासोबतच दालचीनी डायबिटीजच्या उपचारासाठीही फायदेशीर आहे. काळ्या मिऱ्यांमध्ये पायपरीन नावाचं तत्व असतं जे मेटाबॉलिज्म वाढवतं आणि पचनक्रिया चांगलं ठेवतं.
वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर
जर तुम्ही पोटात जडपणा किंवा वजन वाढण्याच्या समस्येने हैराण आहात तर हा काढा तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. कारण काळे मिरे, दालचीनी आणि आले यात असलेल्या अॅंटीऑक्सिडंट्सने मेटाबॉलिज्म आणि डायडेशन मजबूत होतं. त्यामुळे तुम्ही काहीही खाल्लं तरी ते चांगलं पचतं आणि एनर्जी वाढते. याने तुमच्या शरीरात अतिरीक्त चरबी जमा होणार नाही.
कितीदा सेवन करावा हा काढा?
हा आयुर्वेदिक काढा थोडा गरम असतो. त्यामुळे याचं सेवन करताना थोडी काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसात काढा दिवसातून एकदा सेवन केल्यास चालेल, पण गरमीच्या दिवसात आठवड्यातून २ ते ३ वेळा सेवन करा.