मायग्रेन म्हणजे वारंवार आणि अनेकदा डोक्याच्या एकाच बाजूला होणारी तीव्र डोकेदुखी. ही कधी एका बाजूची तर कधी दोन्ही बाजूंची असते. डोकेदुखीबरोबर काहींना ओकार्याही होतात. अर्धशिशीने त्रस्त झालेल्या व्यक्तींमध्ये जवळजवळ 60 % स्त्रिया असल्याचे आढळून आले आहे.अर्धशिशीचा अॅटॅक येण्याचीही काही कारणं आहेत. त्यापैकी महत्त्वाची कारणं म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी होणा-या हार्मोन्स बदलामुळे, तसेच रंगाचा, अत्तराचा सुगंध, प्रकाशाची तीव्रता, चहा-कॉफीचे अति सेवन, अति तेलकट खाणं, अनियमित झोप, अति शारीरिक श्रम, कामाचा ताण, अति व्यायाम, ऋतुमानातील बदल यांमुळे अर्धशिशीचा त्रास वाढू शकतो.
घरगुती उपाय
यावर घरगुती उपाय म्हणजे लिंबू चिरावे आणि अर्धा भाग कपाळावर रगडावा. लिंबाच्या रसातील गुणतत्त्वांमुळे वेदना कमी होतात. नियमितपणे हा उपाय केल्यास अर्धशिशीपासून मुक्ती मिळू शकते. या उपायाबरोबरच ही व्याधी असणार्यांनी नियमितपणे लिंबाच्या सरबताचे सेवन करावे. मात्र, साखरेचा वापर टाळावा. या सरबतात सैंधव वापरणे अधिक चांगले. लिंबाच्या रसामुळे शरीरातील अल्कलाइन आणि इलेक्ट्रोलाइट्समध्ये वृद्धी होते आणि शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
या गोष्टी टाळा
- फार काळ उपाशी राहू नये.- तंबाखू, दारू, सिगारेट आदी व्यसनं टाळा.- अती विचार करू नका.- अती मांसाहार करू नका.- दही वर्ज्य करा.- उन्हात फिरणं टाळा.- छत्री किंवा टोपी घेतल्याशिवाय बाहेर पडू नका.- मानसिक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. अती ताण टाळा.- स्ट्रेस हार्मोन्स (ताण वाढवणारे हार्मोन्स) वाढले तर त्यामुळेसुद्धा हा त्रास वाढतो.
कसा असावा आहार ?
- आहार वेळेवर आणि हलका घ्या. मेंदूला साखर (ग्लुकोज) पोहोचलं पाहिजे. त्यासाठी उन्हाळ्यात खाण्यामध्ये गोडाचं प्रमाण थोडंतरी असावं.- पाणी भरपूर प्या.- गोडं ताक, कोकम सरबत, आवळा सरबत यांचंही सेवन करा.- गोड पदार्थ खा. त्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.