कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात जगभरातील लोकांचे लक्ष कोरोनाची लस कधी येणार याकडे लागले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहे. सध्या घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपायांकडे लोकांचा कल जास्त प्रमाणात आहे. आता आयुष मंत्रालयाकडूनही रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याासाठी आलं, हळद, व्यवनप्राश, काढा यांचे सेवन करण्यासाठी माहिती दिली जात आहे. एका आकाशवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून सचिन वैद्य कोटे त्यांनी लोकांना कोरोनापासून बचावासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याबाबात मार्गदर्शन केले आहे.
आईसीएमआरकडून थोड्या थोड्या वेळाने गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार गरम पाणी प्यायल्याने जठराग्नी योग्य राहतो. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागत नाही. गरम पाणी प्यायल्याने इंट्रीपॉईंट म्हणजेच घश्यात व्हायरस आपली संख्या वाढवू शकत नाही. ओल्या किंवा उगळलेल्या हळदीचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हळदीतील करक्युमिन नावाच्या रसायनामुळे शरीराची सूज कमी करण्यास मदत होते.
शरीरावर कितीही सूज असली, तरी हळदीचे पाणी प्यायल्यास ती कमी होते. हळदीतील करक्युमिन नावाच्या रसायनामुळे शरीराची सूज कमी करण्यास मदत होते. शरीरावर कितीही सूज असली, तरी हळदीचे पाणी प्यायल्यास ती कमी होते. च्यवनप्राशनचे सेवन साधारणपणे हिवाळ्यात केले जाते. पण कोणत्याही ऋूतत याचे सेवन तुम्ही करू शकता. सकाळच्या नाष्त्यासोबत तुम्ही दुधात घालून च्यवनप्राशचे सेवन करू शकता. मागिल चार महिन्यात याची विक्री चार टक्क्यांनी वाढली आहे.
गुळवेल या वनस्पतीचं सेवन जर तुम्ही केलं तर वेगवेगळया आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. गुळवेलाला गिलोय असं सुद्धा म्हणतात. गिलोयमध्ये अनेक एन्टिऑक्सीडंट्स आणि एन्टीबॅक्टेरीअल गुण असतात. स्फोरस, कॉपर, कॅल्शियम, जिंक आणि मॅग्निशियम आणि मिनरल्स असतात.
त्यासाठी गुळवेल आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. काढा करण्यासाठी १ कप गुळवेल घेतल्यास त्याच्या दोन ग्लास पाणी घालावे. हे मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडवट लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे. अतिशय गुणकारी असलेल्या गुळवेलाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण