शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

तोंडात होणारा 'हा' गंभीर आजार सहजासहजी नाही होत बरा! मात्र हे घरगुती उपाय ठरतील रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 4:53 PM

आपल्या स्वयंपाकघरात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून या समस्येपासून आपण सुटका मिळवू शकतो.

आरोग्याशी निगडीत अनेक अशा समस्या आहेत ज्यावर घरच्याघरी साधारण उपचार करून आराम मिळवता येतो. यात तोंड येणं (Mouth Ulcer) ही सर्वसामान्यपणे केली जाणारी तक्रार असते. व्हिटॅमिन्सची कमतरता (Lack Of Vitamins), डिहायड्रेशन (Dehydration) आणि काही विशिष्ट अन्नपदार्थांतून होणारी अ‍ॅलर्जी यामुळे तोंड येणं ही समस्या उदभवते. पण आपल्या स्वयंपाकघरात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून या समस्येपासून आपण सुटका मिळवू शकतो. ‘लाइव्ह हिंदुस्थान हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय.

बहुतांशी कुटुंबातील एखाद्या तरी सदस्याला माऊथ अल्सरचा त्रास सतत होत राहतो. तोंड आल्यानं अनेकांना खाण्या-पिण्यासह बोलणंही अवघड होऊन बसतं. प्रत्येक व्यक्तीत ही समस्या भिन्न कारणानं निर्माण होऊ शकते. तोंड आल्यानंतर यापासून आराम मिळावा म्हणून बाजारात अनेक प्रकारची जेल (Gel) मिळतात. पण यावर खर्च करण्यापेक्षा घरगुती उपचार करणं कधीही चांगलं ठरतं.

अ‍ॅपल सीडर व्हिनेगरतोंड आल्यानंतर अ‍ॅपल सीडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar ) फार उपयोगी ठरतं. अल्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या तोंडातील जंतूंशी लढण्यास यामुळे मदत मिळते. एका छोट्या कपात कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा व्हिनेगरला चांगल्या तऱ्हेने मिसळावे. त्यानंतर या मिश्रणाने गुळण्या कराव्यात. त्या पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवावं. सकाळ-सायंकाळ ही क्रिया केल्यानंतर अल्सर लवकर बरा होतो.

मधमधामध्ये (Honey) अनेक औषधी गुण आहेत. जखमा भरण्यासाठी मधाचा चांगला उपयोग होतो. तोंड आल्यानंतर मध लावावा. दर दोन तासांनी मध लावत राहिल्यास त्यांचे चांगले परिणाम पाहायला मिळतील.

नारळाचं दूधअल्सरमुळे तोंडाची फार जळजळ होत असते. या समस्येमुळे काही खाता-पिता येत नाही. यापासून आराम मिळवण्यासाठी नारळाचं दूध (Coconut Milk) एक उत्तम पर्याय आहे. यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा नारळाच्या दुधाने गुळण्या करायला हव्यात. यामुळे तोंडातील जळजळ कमी होण्यास मदत मिळते. तर नारळाच्या दुधापासून गुळण्या केल्यानंही फायदा होऊ शकतो.

हळदकुठल्याही प्रकारची जखमी झाली की त्यावर हळद (Turmeric) लावल्यास ती जखमी भरून काढण्यास चांगली मदत करते. हळदीमध्ये अनेक औषधी गुण आहेत. तोंड आल्यानंतरही हळदीचा उपयोग होतो. यासाठी हळद आणि पाणी घेऊन हळदीची घट्ट पेस्ट बनवावी. तोंड आलेलं असल्यास दिवसातून तीन वेळा ती पेस्ट लावावी. यामुळे नक्की आराम मिळू शकतो.

दरम्यान, शरीरात लोह (Iron), व्हिटॅमिन बी (Vitamin B) ची कमतरता असेल तर सतत तोंड येतं. तसंच अति प्रमाणात तिखट, तेलकट व मसाल्याच्या पदार्थांचं सेवन केलं जात असल्यास ही समस्या उदभवू शकते. वरील घरगुती उपाय करून तोंड येण्याच्या समस्येपासून सुटका करता येते. पण पौष्टिक आहार घेऊन तोंड येण्याची समस्याच उदभवणारच नाही यासाठी प्रयत्न करणंही तितकचं महत्त्वाचं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स