वातावरणातील बदल किंवा वाढतं प्रदुषण यांमुळे अनेक लोकांना सायनसची समस्या उद्भवते. वातावरणातील बदलांमुळे सायनसची समस्या वाढण्याचा धोका आणखी वाढतो. सायनस म्हणजे शरीराला झालेलं एक प्रकारचं इन्फेक्शनच असतं. सायनसमुळे नाकाचं हाड, गाल आणि डोळेही दुखू लागतात.
खरं तर सायनस नाकाशी निगडीत एक समस्या आहे. यामध्ये सायनसचा त्रास होणाऱ्या व्यक्तीचं नाक आणि आजूबाजूच्या अर्ध्या भागात वेदना जाणवू लागतात. हिवाळ्यात ही समस्या आणखी वाढते. यामध्ये नाक बंद होणं, डोकेदुखी आणि नाकातून पाणी येणं यांसारखी लक्षणं दिसतात. अनेकदा लोक सायनसच्या वेदनांकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं खरचं महागात पडू शकतं. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यांमुळे सायनसमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी मदत होते.
मध
काही घरगुती उपायांनी तुम्ही सायनसची समस्या दूर करू शकता. मधामध्ये जीवाणुरोक्षी, अॅन्टीव्हायरल आणि अॅन्टीसेप्टिक गुणधर्म आढळून येतात. नियमितपणे याचं सेवन केल्याने नाक आणि घशात होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव करतं.
सफरचंदाचं व्हिनेगर
सफरचंदाचं व्हिनेगर सायनसवर अत्यंत गुणकारी ठरतं. सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे सायनसची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. सफरचंदाचं व्हिनेगर एक उत्तम घरगुती उपाय आहे.
कांद्याचा रस
सायनसचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर करा. कांद्यामध्ये अॅन्टीबॅक्टेरियल गुणदर्म असतात. जे सायनसचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतात. सायनसवर उपचार करण्यासाठी हे एक उत्तम औषध आहे.
पुदिना
सायनसची समस्या दूर करण्यासाठी पुदिना अत्यंत गुणकारी आहे. गरम पाण्यामध्ये पुदीन्याच्या पानांच्या रसाचे काही थेंब टाकून त्याची वाफ घ्या. आराम मिळेल.
गरम पाण्याची वाफ घ्या
सायनसपासून सुटका करून घेण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्या. त्यामुळे नाकात आणि गळ्यामध्ये जमलेली धूळ आणि मातीचे कण साफ होऊन जातात. यामुळे सायनसच्या समस्येपासून सुटका होते. गरम पाण्याची वाफ घेताना त्यामध्ये निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकणं फायदेशीर ठरतं.
याव्यतिरिक्त, सायनसचा त्रास होत असेल तर नेहमी थोड्याशा शिजवलेल्या भाज्यांचं सूप , सफरचंद, डाळी आणि भाज्यांचं सेवन करा. याव्यतिरिक्त कफ तयार होण्यास मदत करणारे पदार्थ म्हणजे, चॉकलेट, अंडं, साखर आणि मैदा यांसारख्या पदार्थांचं सेवन करणं टाळा. तसेच जास्त तेलकट पदार्थांचं सेवन केल्यामुळेही सायनसचा त्रास होऊ शकतो. यावर भरपूरप्रमाणात पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.)