(Image Credit : FirstCry Parenting)
अनेकदा काही खाल्लं की, काही लोकांच्या पोटात जळजळ सुरु होते. खासकरुन जास्त तिखट किंवा मसालेदार काही खाल्ल्यावर ही समस्या होते. तसेच ज्यांना अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या असते, त्यांच्या पोटही नेहमी गरम राहतं. पोटात गरम वाटण्याची किंवा जळजळ होण्याची ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, याने रुटीन लाइफ डिस्टर्ब होते.
छातीत आणि पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण अन्न पचण्यासाठी आवश्यक असलेला रस तयार होण्याची अनियमीतता. पण ही समस्या आपल्या किचनमध्ये असलेल्या कितीतरी पदार्थांच्या माध्यमातून सहज दूर केली जाऊ शकते. यांनी पोटाचीची नाही तर इतरही समस्या दूर होतात. पोटात होणारी जळजळ केवळ १० मिनिटात दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
जेवण झाल्यावर गूळ खावा
जर तुम्हाला पोटात जळजळ होण्याची समस्या होत असेल तर रोज जेवण झाल्यावर थोडा गूळ चघळायला हवा. गूळ चाऊन खाऊ नका. जितका जास्त तुम्ही गूळ चघळाल तितका जास्त फायदा होईल. याने पचनक्रियेची क्षमता वाढते आणि पोटाची जळजळ होण्याची समस्याही दूर होते.
टोमॅटो आणि संत्री
(Image Credit : Saveur Chic)
पोटात होणारी जळजळ दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतं. कच्चा टोमॅटोचा आहारात समावेश करा. याने अॅसिडिटी आणि पोटाची जळजळ लगेच दूर होईल. टोमॅटोमुळे शरीरातील क्षारचं प्रमाण वाढतं. ठिक असंच काम संत्री करतात.
आल्याचा रस
आल्याचा रस सुद्धा पोटातील जळजळ आणि गरम वाटणं दूर करतो. लिंबाचा रस, मध आणि आल्याचा रस पाण्यात एकत्र करुन सेवन करा. याने पोट शांत होईल. आल्यामध्ये अॅंटी बॅक्टेरिअल गुणही असतात त्यामुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया सुद्धा नष्ट होतात.
बडीशेपेचं पाणी
१ कप उकळलेल्या पाण्यात एक चमचा बडीशेप मिश्रित करुन रात्रभर तसंच ठेवा. सकाळी हे मिश्रण गाळून त्यात एक चमचा मध टाकून सेवन करा. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्या. याने पोटाची जळजळ, अॅसिडिटीची समस्या दूर होईल. तसेच पोट फुगणे आणि गॅसची समस्याही दूर होईल.
ओवा
एका पॅनमध्ये ओवा भाजून त्याची पावडर तयार करा. यात थोडं काळं मीठ मिश्रित करा. हे जेवण केल्यावर कोमट पाण्यासोबत सेवन करा. याने पोटाची जळजळ आणि अॅसिडिटी दूर होईल. ओव्यात थायमॉल आणि काळ्या मिठात अल्केलाइड्स असतात. याने अॅसिडिटी दूर होते.
(टिप - वरील सल्ले केवळ माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. यातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला याचा फायदा होईलच असे नाही.)