शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
5
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
6
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
7
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
8
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
9
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
10
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
11
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
12
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
13
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
16
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
17
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
18
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
19
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
20
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

युरिन करताना येणाऱ्या समस्यांवर राबमाण आहेत 'हे' घरगुती उपाय....मिळेत तात्काळ आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 9:13 PM

युरिन पास करताना जळजळ (Inflammation) देखील होते. काही वेळा संसर्गामुळे (Infection) हा त्रास होऊ शकतो. पण पुरेसं पाणी न प्यायल्यानं ही समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) फायदेशीर ठरतात.

उत्तम आरोग्यासाठी (Health) जसा आहार (Diet) महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी (Water) पिणंदेखील गरजेचं आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तसंच रक्तप्रवाह आणि किडनीचं कार्य सुरळीत राहण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. सध्याच्या काळात धावपळीची जीवनशैली किंवा अन्य काही कारणांमुळे दिवसभरात पुरेसं पाणी पिण्याकडं दुर्लक्ष होतं.

त्यामुळे युरिन (Urine) अर्थात लघवीशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. काही वेळा लोकांना वारंवार लघवीला जावं लागतं. तसंच युरिन लागल्याची भावना निर्माण होते. युरिन पास करताना जळजळ (Inflammation) देखील होते. काही वेळा संसर्गामुळे (Infection) हा त्रास होऊ शकतो. पण पुरेसं पाणी न प्यायल्यानं ही समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies) फायदेशीर ठरतात. `एनडीटीव्ही इंडिया`ने या विषयी वृत्त दिलं आहे.

वारंवार युरिनला जावं लागणं, युरिन लागल्याची भावना निर्माण होणं, युरिन पास होताना जळजळ होणं किंवा ओटीपोटात वेदना होणं या समस्यांमागे अनेक कारणं असू शकतात. सर्वसामान्य कारणांचा विचार केला तर पुरेशा प्रमाणात पाणी न पिणं, मसालेदार पदार्थ खाणं यामुळे युरिनला त्रास होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीनं दिवसभरात किमान आठ मोठे ग्लास किंवा तीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. हा उपाय करूनही युरिनची समस्या कायम असेल तर काही घरगुती उपाय उपयोगी ठरतात.

युरिनशी निगडित कोणतीही समस्या जाणवत असेल तर रोज नारळाचं (Coconut) अर्थात शहाळ्याचं पाणी पिणं आवश्यक आहे. शहाळ्यात निसर्गतः व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीर हायड्रेट राहतं. नियमित शहाळ्याचं पाणी प्यायल्यानं युरिनला जळजळ होत नाही. युरिनला साफ होते आणि वारंवार युरिनला जावं लागत नाही.

युरिन करतेवेळी जळजळ होत असेल तर सर्वप्रथम दिवसभरात पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. लिंबू आणि पुदिन्याचा अर्क टाकून पाणी प्यायल्यास संसर्गाचा धोका कमी होतो. युरिन करतेवेळी होणारी जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात लसणाचा (Garlic) वापर करू शकता. लसणात अ‍ॅंटिफंगल (Antifungal) आणि अ‍ॅंटिबॅक्टेरियल (Antibacterial) गुणधर्म असतात. यामुळे शरीराची बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता वाढते. मूत्रमार्गात संसर्ग झाला असेल तर तो दूर करण्यासाठी लसणाचा आहारात समावेश उपयुक्त ठरतो.या घरगुती उपायांच्या मदतीनं युरिनशी निगडित समस्या दूर होतात. तसंच संसर्गापासून बचाव होतो आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स