बदलणाऱ्या वातावरणात आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यांपैकी अधिक आजार इन्फेक्शनमुळे होतात. वायरल इन्फेक्शन आणि सीझनल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे मध. यामध्ये असणारी पोषक तत्व इन्फेक्शनवर उपाय करतातच पण रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी मदत करतात.
(Image credit : mediwell.co.za)
घशात होणारी खवखव
बदलणारं वातावरण, प्रदूषण आणि चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार यांमुळे अनेकदा घशात खवखव आणि इन्फेक्शनसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकदा घशात वेदनाही होतात. काही गिळताना घशामध्ये वेदना किंवा त्रास होणं हेदेखील सोप थ्रोट म्हणजेच, घशामध्ये होणाऱ्या खवखवीचं लक्षणं आहे.
जर तुम्हाला घशात होणाऱ्या खवखवीपासून सुटका करायची असेल तर मधाचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया मधाचं सेवन कसं करावं त्याबाबत...
पौष्टिक तत्वांचा स्त्रोत आहे मध
मधामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व आढळून येतता. यामध्ये आयर्नसोबतच हेल्दी असणारं प्रूट ग्लूकोजही असतं. जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. एवढचं नाहीतर मधामध्ये फॅट्स अजिबात नसतात. ज्यामुळे मध वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये पोटॅशिअम, सोडिअम आणि क्लोरिन यांसारखे खास गुणधर्म असतात.
खोकला आणि सर्दीवर मध गुणकारी
सर्दी, पडसं आणि खोकला यांसारख्या समस्या उद्भवल्यानंतर अनेकदा घशामध्ये वेदना, खवखव यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून मध आल्यासोबत एकत्र करून त्याचा वापर करा. एक चमचा मधामध्ये थोडंसं आल्याचा रस एकत्र करा आणि त्याचं सेवन करा. तुम्हाला फायदा होईल.
मधाचा टोस्ट
आलं सगळ्यांसाठीच फायदेशीर असेल असं नाही. जर तुम्ही गरम पदार्थांप्रती संवेदनशील असाल तर तुम्हाला आलं खाल्याने नुकसान होऊ शकतं. अनेकदा यामुळे घशामध्ये अल्सर किंवा खवखव होऊ शकते. त्यामुले घशाला सूज येते आणि वेदनाही होतात. यापासून बचाव करण्यासाठी मध ब्रेड किंवा चपातीवर लावून खाणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे गळ्यामधील वेदना आणि सूज कमी होते.
दूध आणि मध
जर तुम्हाला झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल आणि तुम्ही सतत आजारी पडत असाल तर रात्री झोपताना कोमट दूधामध्ये मध एकत्र करून पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे तुम्हाला शांत झोप येते आणि आजारही दूर होतात. तसेच यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबुत होण्यास मदत होते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)