अनेकजण थंड पाण्याने तर काही जण गरम पाण्याने आंघोळ करतात. पण यावर एक चर्चा नेहमीच होते की, थंड पाण्याने आंघोळ (Bathing Tips) करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं की, गरम पाण्याने आंघोळ करणं. तज्ज्ञ सांगतात की, आंघोळीच्या पाण्याचा तापमान कमी असावं किंवा कमी. याबाबत प्रत्येकाला व्यक्तिगत आवड वेगवेगळी असू शकते. सामान्यपणे लोक थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करतात. तर उन्हाळ्यात थंड पाण्याचा वापर केला जातो. थंड आणि गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि नुकसान याबाबत तज्ज्ञांनी रिसर्च केले आहेत.
असं मानलं जातं की, मेंदू शांत करणे आणि शरीर अॅक्टिव ठेवण्यासाठी थंड पाणी तर दिवसभराचा थकवा आणि अंगदुखी दूर करण्यासाठी गरम पाण्याने फायदा होतो. पण खरंच असं आहे का? किंवा वेगवेगळ्या आरोग्य स्थितीच्या आधारावर आंघोळीच्या पाण्याचं तापमान ठरवलं पाहिजे. क्वीवलॅंड क्लीनिकच्या रिपोर्टमध्ये एक्सरसाइज फिजिओलॉजिस्ट जॅच कार्टर यांनी थंड आणि गरम पाण्याने आंघोळ करण्याच्या फायद्यांबाबत सांगितलं आहे.
थंड पाण्याने आंघोळ किती योग्य?
जगातल्या जास्तीत जास्त भागांमध्ये आंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर करण्याचं चलन आहे. याचे अनेक प्रकारचे फायदे असल्याचं सांगितलं जातं. क्लीवलॅंड क्लीनिकच्या रिपोर्टमध्ये जॅच कार्टर याला इतकेही फायदेशीर मानत नाहीत. कार्टर सांगतात की, थंड पाण्याने आंघोळ करणं काही स्थितींमध्ये आरोग्यासाठी गंभीर समस्येचं कारण ठरू शकतं. जर तुम्हाला हृदयरोगाची समस्या असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं नुकसानकारक ठरू शकतं. थंड पाण्याप्रति शरीराची प्रतिक्रिया तुमच्या हृदयावर अतिरिक्त दबाव टाकते. ज्याने हृदयाची धडधड अनियमित होऊ शकते. पण निरोगी लोकांनी शरीर अॅक्टिव ठेवण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी थंड पाण्याने नक्की आंघोळ करावी.
थंड पाण्याने आंघोळ करताना घ्या काळजी
जर तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करायची असेल तर तज्ज्ञ सांगतात की, यासाठी सर्वातआधी आपल्या शरीराला वेळ देणं आवश्यक आहे. अशावेळी खूप जास्त थंड पाणी न घेता आधी सुरूवात कमी थंड पाण्याने करा नंतर थंड पाणी घ्या. याची एक चांगली पद्धतही आहे. सर्वातआधी तुम्ही थंड पाणी पायांवर टाका जेणेकरून मेंदूपर्यंत हा संकेत पोहोचेल की, शरीराचं तापमान नियंत्रित झालं आहे. त्यानंतर थंड पाणी शरीरावर टाका.
गरम पाण्याने आंघोळ करणं किती योग्य?
शरीराचा थकवा दूर करण्यासाठी भलेही लोक गरम पाण्याने आंघोळ करण्याची वकालत करत असतील. पण आरोग्य तज्ज्ञ याने संतुष्ट नाहीत. स्टॅनफोर्ट यूनिव्हर्सिटीमध्ये त्वचा विज्ञान विभागातील सहायक प्रोफेसर डॉ. गॉर्डन बे म्हणाले की, गरम पाण्याने आंघोळ करणं तुमच्या त्वचेसाठी चांगलं नाही. गरम पाण्याने त्वचेचा चिकटपणा दूर होतो. ज्यामुळे त्वचा कोरडी होते आणि इतरही अनेक समस्या होतात.
आंघोळीला कशा पाण्याचा करावा वापर?
डॉक्टर म्हणाले की, ज्या लोकांना एक्जिमा किंवा सोरायसिससारखी त्वचा संबंधी समस्या आहे. त्या लोकांसाठी गरम पाण्याने आंघोळ करणं अधिक नुकसानकारक ठरेल. याने खास वाढण्याचा धोकाही असतो. डॉ. गॉर्डन बे म्हणाले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील ताण कमी होतो आणि लालीही कमी होते. जर तुम्ही निरोगी आहात तर दररोज थंड पाण्याने आंघोळ करणं तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. अर्थातच थंड पाण्याने आंघोळ करणं गरम पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा चांगला पर्याय आहे.