अती गरम कॉफीने कर्करोगाचा धोका !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2016 3:05 PM
कोणतेही काम केल्यानंतर किंवा झोपेतून उठल्यानंतर हमखास वाफाळलेला चहा व कॉफी आपण घेतो.
त्यामुळे मूड फ्रेश होऊन पुन्हा कामाला सुरूवात क रता येते. परंतू, या जास्त गरम चहा किंवा कॉफीने कर्करोगाचा धोका असल्याचे, आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने हे सांगितले आहे. या दोन्हीही पेयाचे फायदे व तोटे आहेत. अलीकडे करण्यात आलेल्या एका संशोधनात कॉफी रक्ताच्या कर्करोगाला मदत करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही लोक मोठ्या प्रमाणात कॉफीचे सेवन करतात. अति गरम चहा व कॉफी सेवन केल्याने चीन, इराण, तुर्कस्तान, दक्षिण अमेरिका या देशामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. ६० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक उष्ण चहा किंवा कॉफी घेतल्याने कर्करोग बळाविण्याची मोठी शक्यता असते.