शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

कोरोनाकाळात फुफ्फुसांची इम्युनीटी 'अशाप्रकारे' करा बुस्ट, तज्ज्ञांच्या 'या' टिप्सने हे सहज शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 4:04 PM

कोरोनाच्या काळात फुफ्फुसांच्या आरोग्याची (Lung health) काळजी घेणे खूप गरजेचे झाले आहे, हे सर्वांना माहीत आहे, कारण कोरोना विषाणू प्रथम फुफ्फुसांना लक्ष्य करतो.

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य टिकवून ठेवणे फार महत्त्वाचे आहे. योग्य आहार आणि व्यायाम करणे काळाची गरज आहे. आज आपण अशा गोष्टींविषयी जाणून घेऊया जे तुमच्या फुफ्फुसांना थेट हानी पोहोचवू शकतात. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, फुफ्फुस (Lung) शरीरातील अनेक कार्ये उत्तम प्रकारे चालवतात. फुफ्फुस खराब झाल्यावर आपल्या शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळण्यात खूप त्रास होऊ (Harmful Food for Lung) लागतो. त्यामुळे शरीरात इतर अनेक अडचणी निर्माण होतात. कोरोनाच्या काळात फुफ्फुसांच्या आरोग्याची (Lung health) काळजी घेणे खूप गरजेचे झाले आहे, हे सर्वांना माहीत आहे, कारण कोरोना विषाणू प्रथम फुफ्फुसांना लक्ष्य करतो.

आहार तज्ज्ञ काय म्हणतातफुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार आवश्यक असल्याचे आहारतज्ज्ञ डॉ.रंजना सिंह यांनी झी न्यूजला माहिती दिली आहे. अशाही काही गोष्टी आहेत, ज्यामुळे फुफ्फुसे कमकुवत होतात, त्यांच्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. यामध्ये धुम्रपान आणि तंबाखू व्यतिरिक्त प्रक्रिया केलेले मांस, साखरयुक्त पेये आणि खूप मद्यपान यांचा समावेश आहे. त्यांच्या सेवनाने फुफ्फुसांना इजा होऊ शकते. त्यामुळे त्यांचे सेवन करू नये.

फुफ्फुसासाठी हानिकारक गोष्टी

मर्यादेत दुग्धजन्य पदार्थांचे सेवनदूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले, तरी जेव्हा तुम्ही त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करण्यास सुरुवात करता तेव्हा ते फुफ्फुसासाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांचे अधिक सेवन करू नये.

मीठसिंह यांच्या मते, मीठ आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते, परंतु मर्यादित प्रमाणात. जेव्हा कोणी जास्त प्रमाणात मीठ खातो तेव्हा त्याला फुफ्फुसाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळेच फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी मीठाचे सेवन कमी करा.

साखरयुक्त पेयांपासून दूर रहाआरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की साखरयुक्त पेये फुफ्फुसासाठी हानिकारक आहेत, कारण यामुळे प्रौढांमध्ये ब्राँकायटिस होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत साखरयुक्त पेयांचे सेवन टाळावे. त्याऐवजी जमेल तेवढे पाणी प्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स