बदलत्या लाइफस्टाइलमुळे वजन वाढणे ही अलिकडे फारच गंभीर समस्या झाली आहे. तज्ज्ञांनुसार, वजन वाढल्याने डायबिटीज, कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मग सुरु केला जातो वजन कमी करण्यासाठीचा संघर्ष. वजन कमी करण्यासाठी हजारों रुपये खर्च केले जातात. पण जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि डाएट, एक्सरसाइज फॉलो केली तर वजन कमी होऊ केलं जाऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला एका खास एक्सरसाइजबाबत सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न करु शकता.
एका तासात १ हजार कॅलरी बर्न करणे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाहीये. अर्थातच एक तास एक्सरसाइज करणे म्हणजे भूक तीन पटीने वाढणे. त्यामुळे जास्त खाल्याने वजन कमी होण्याऐवजी अधिक वाढतं. पण याचा अर्थ वजन कमी करणे अशक्य नाहीये. काही अशा एक्सरसाइज आहेत ज्या माध्यमातून तुम्ही एका तासात कॅलरी बर्न करु शकता.
या गोष्टींची घ्या काळजी
फिटनेस एक्सपर्टनुसार, तुम्ही अॅरोबिकपासून ते कार्डियासारख्या हाय-इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग करुन एका तासात एक हजार कॅलरी बर्न करु शकता. यासाठी तुम्हाला कमी वेळात हाय-इंटेसिटी एक्सरसाइज करावी लागेल आणि त्यानंतर ३० सेकंदासाठी आराम करावा. त्यानंतर पुन्हा एक्सरसाइज करा. तुम्ही जिम सोडल्यानंतरही याने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळेल.
रोप जम्पिंग
रोप जम्पिंग हे रनिंगसारखंच आहे. ही एक अशी एक्सरसाइज आहे ज्याने पूर्ण शरीरावप प्रभाव पडतो. या एक्सरसाइजच्या माध्यमातून तुम्हाला एका तासात ७५० ते १०४७ कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. ही एक्सरसाइज करताना ही काळजी घ्या की, ही एक्सरसाइज हळूहळू करु नये आणि काही वेळाने ब्रेक घेत रहावा.