- मयूर पठाडेकोणता व्यायाम करायचा, याबाबत महिलांमध्ये बºयाचदा संभ्रम असल्यामुळे त्यातल्यात्यात सोपा पर्याय त्या निवडतात. व्यायाम करायचाच झाल्यास, रस्त्यानं चालणं, जॉगिंग ट्रॅकवर फिरणं किंवा ग्रीन जिममध्ये थोडा व्यायाम करणं यावरच मुख्यत्वे त्यांचा भर असतो.आपण पुरुषांसारखे बळकट दिसायला नको, या कारणानं काही स्त्रिया व्यायामही तोलून मापूनच करताना दिसतात. यामागे मुख्य भीती असते ती आपल्या मसल्सचं रुपांतर फॅट्समध्ये होईल की काय!याचमुळे अनेक स्त्रिया व्यायाम मध्येच सोडूनही देतात. पण मसल्स आणि फॅटस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज असतात.जेव्हा तुमच्या अॅक्टिव्हिटीज अतिशय कमी असतात, बसून राहण्याचं प्रमाण जास्त असतं आणि विशेषत: जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग एकदमच सोडता, त्यावेळी तुमचे मसल्स लूज होतात. त्यात तुमचा आहार बिघडला, कॅलरी इनटेक चुकीचं असलं, तर आपल्या मसल्सचं रुपांतर फॅट्समध्ये होतंय की काय, अशीही शंका यायला लागते. पण खरं तर अशावेळी मसल्स कमी झालेले असतात आणि फॅट्स वाढलेले असतात.आपल्या शरीरातील फॅट्स आणि मसल्स यावर योग्य नियंत्रण राखायचा सर्वाेत्तम उपाय म्हणजे तशाच प्रकारचा व्यायाम आपण करायला हवा.आपल्या शरीरातील फॅट्स बर्न करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाईज महत्त्वाचा ठरतो आणि आपले मसल्स व्यवस्थित टोन ठेवण्यासाठी, त्यांना योग्य आकार, उकार आणण्यासाठी वेट ट्रेनिंगचा जास्त फायदा होतो.त्यामुळे व्यायाम करताना महिलांनी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं. त्याचा दुहेरी फायदा त्यांना होऊ शकतो.
फॅट्स बर्न कसे कराल आणि मसल्सला टोन कसा आणणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 3:10 PM
फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी उपयुक्त टिप्स..
ठळक मुद्देआपल्या शरीरातील फॅट्स आणि मसल्स यावर योग्य नियंत्रण राखण्यासाठी तशाच प्रकारचा व्यायाम आपण करायला हवा.आपल्या शरीरातील फॅट्स बर्न करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाईज महत्त्वाचा ठरतो.मसल्स व्यवस्थित टोन ठेवण्यासाठी, त्यांना योग्य आकार, उकार आणण्यासाठी वेट ट्रेनिंगचा जास्त फायदा होतो.