(Image Credit : Indiatimes.com)
प्रत्येक व्यक्तीचं शरीर एकसारखं नसतं. कुणी सडपातळ असतं तर कुणी जाड किंवा कुणी सामान्य. सडपातळ लोकांना सामान्यपणे नेहमीच कमजोर मानलं जातं. पण असं नसतं. शरीराच्या बनावटीवरून कुणाबाबत काही विचार करू नये. व्यक्तींनी फिटनेसकडे लक्ष द्यावं. मात्र सडपातळ किंवा सामान्यापेक्षा बारीक लोकांनी स्वत:ला फिट कसं ठेवावं असा प्रश्न अनेकांना पडतो. बारीक किंवा सडपातळ लोकांना त्यांच्या आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, जे लोक सामान्य वजनापेक्षा कमी वजनाचे असतात तेव्हा हार्ट स्ट्रोक येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा लोकांसाठी आम्ही काही खास फिटनेस टिप्स घेऊन आलो आहोत.
सडपातळ लोकांनी फिटनेससाठी काय करावं?
बारीक किंवा सडपातळ लोक नेहमी असं म्हणतात की, त्यांना एक्सरसाइजची गरज नसते. पण असं नाहीये. फिटनेससाठी जाड असणे किंवा बारीक असणे यात फरक नाही. व्यक्तीच्या फिटनेससाठी शरीराची क्षमता महत्त्वाची असते. चला जाणून घेऊ बारीक किंवा सडपातळ लोकांनी फिटनेससाठी काय करावं? सडपातळ लोकांनी फिटनेससाठी दिवसातून कमीत कमी ३० मिनिटे एक्सरसाइज करावी.
स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एरोबिक
बारीक लोकांच्या फिटनेससाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एरोबिक एक्सरसाइज सर्वात चांगली असते. शरीर फिट ठेवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि शरीराची क्षमता वाढण्यासाठी एरोबिक एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. तसेच या लोकांनी आठवड्यातून कमीत कमी ३ दिवस ३० मिनिटे एरोबिक एक्सरसाइज करावी.
बारीक लोकांसाठी डाएट प्लॅन
बारीक लोकांमध्ये फॅट कमी असतं, त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट असणं गरजेचे आहेत. त्यांनी आहारातून ३० टक्के प्रोटीन आणि १५ टक्के नट्स आणि धान्याचा समावेश करावा. बारीक लोक असो वा जाड सर्वांच्या आहाराता योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असणे गरजेचे आहेत. आहारात दिवसातून कमीत कमी दोन प्रकारच्या भाज्या आणि फळांचा समावेश करायला हवा. जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांना वेगळ्या व्हेज पदार्थांमधून प्रोटीनची गरज पूर्ण करता येऊ शकते.
(टिप - वरील टिप्स केवळ सामान्य माहिती आहे. ती केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहचवत आहेत. यातील काहीही उपाय करण्यापूर्वी किंवा या टिप्स फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येकाला या गोष्टी लागू पडतील असं नाही. त्यामुळे समस्या होण्याची शक्यताही असते.)