(Image Credit : Sponge School)
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणात उकाडा वाढला आहे. अशातच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. पण खरं तर उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्याकडे दुर्लक्षं केलं तर ते आजारी पडू शकतात. खरं तर उन्हाळ्यामध्ये सन स्ट्रोक लहान मुलांना होण्याची जास्त भिती असते. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मुलांमध्ये उकाडा किंवा ऊन सहन करण्याची शक्ती फार कमी असते. यामुळे ते लगेच आजारी पडतात. अशातच मुलांना उष्णतेपासून दूर ठेवण्यासाठी काही हेल्थ टिप्स अत्यंत फायदेशीर ठरतात. ज्यांचा वापर करून त्यांना उष्णतेपासून दूर ठेवणं सहज शक्य होतं आणि त्यांचं आरोग्य राखण्यासही मदत होते.
उन्हाळ्यामध्ये मुलांना किती पाणी द्यावं?
उन्हाळ्यामध्ये मुलांना शाळेला सुट्टी असते. अशातच ते दिवसभर घराबाहेर असतात. जर तुम्ही मुलांना जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी द्या. पण अनेकदा मुलं पाणी पिण्यास नकार देतात किंवा पितो सांगून न पिताच घराबाहेर निघून जातात. अशावेळी मुलांना असे काही पदार्थ खाण्यासाठी द्या, ज्यांच्यामध्ये वॉटर कन्टेंट जास्त असेल.
उन्हाळ्यामध्ये मुलांची देखभाल करण्यासाठी कपड्यांची काळजी
उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान राखण्यासाठी हलक्या रंगाचे कपडे फायदेशीर ठरतात. एकीकडे गडद रंगाचे कपडे सूर्याची उष्णता शोषून घेतात. तर दुसरीकडे हलक्या रंगाचे कपडे उष्णता परावर्तित करतात. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.
यावेळी उन्हाळ्यात मुलांना जास्त बाहेर जाऊ देऊ नका
उन्हाळ्यामध्ये मुलांना आजारांपासून दूर ठेवायचं असेल तर त्यांना दुपारच्यावेळी 12 ते 4 वाजेपर्यंत बाहेर पाठवू नका. यादरम्यान घरातच ठेवा आणि इनडोर गेम्स खेळण्यासाठी प्रवृत्त करा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळची वेळ घरातून बाहेर पडण्यासाठी उत्तम वेळ असते.
उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी डाएट प्लॅन
उन्हाळ्यामध्ये मुलांना शक्य तेवडं जंक फूडपासून दूर ठेवा. कारण मसालेदार पदार्थांमुळे शरीराची उष्णता वाढते. जंक फूडऐवजी मुलांना कंलिगड, टरबूज आणि किवी यांसारखी ताजी फळं खाण्यासाठी द्या. याव्यतिरिक्त जेव्हही मुलं बाहेर खेळण्यासाठी जातात. तेव्हा त्यांना सनस्क्रिन लावा. सनस्क्रिन हानिकारक सूर्याची किरणं आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानांपासून बचाव करण्यासाठी मदत करतात.