राग हा काही कुणाच्या हातचा नाहीये. वेगवेगळ्या कारणांनी कुणालाही पटकन राग येऊ शकतो. मग कारण मोठं असो वा छोटं...पण ज्या रागावर तुम्ही कंट्रोल मिळवू शकत नाही, त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि नात्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. याने तुमच्या व्यवहारात केवळ नकारात्मकताच येते असे नाही तर लोकंही तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. जर तुम्हीही तुमच्या रागाने परेशान आहात, तर आम्ही तुम्हाला ती उपाय सांगत आहोत. या उपायांच्या मदतीने तुमचा रागही कमी होईल आणि लोकंही दूर जाणार नाहीत.
स्वत:ला प्रश्न करा
रागीट लोकांबाबत हे नेहमीच पाहिलं जातं की, ते छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करु लागतात. रागात त्यांना हे माहितही नसतं की, ते काय बोलत आहेत. राग ओसरल्यावर काही वेळाने त्यांना जाणीव होते की, त्यांनी चुकीच्या शब्दांचा प्रयोग केलाय. तुमचही असंच होत असेल. जर तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवायचं असेल तर काहीही बोलण्याआधी स्वत:ला प्रश्न विचारा की, या स्थितीत रागवणं गरजेचं आहे का? तुम्हाला स्वत:ला याचं उत्तर मिळेल.
नियमीत व्यायाम करा
अनेकदा असे पाहिले गेले आहे की, जे लोक योगाभ्यास किंवा ध्यानसाधना करतात ते छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करत नाहीत. तसेच तुम्ही शारीरिक व्यायाम केला तर तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होईल. इतकेच नाही तक याने तुम्हाला तणावातूनही मुक्ती मिळेल. अनेकदा तणाव हाच रागाचं कारण बनतो, त्यामुळे नियमीतपणे योगाभ्यास किंवा व्यायाम करा. जर तुम्हाला राग येत असेल किंवा चिडचिड होत असेल तर बाहेर फिरायला जा, धावायला जा किंवा व्यायाम करा. तसेच मन शांत ठेवण्यासाठी आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यानसाधनाही फायदेशीर ठरते.
हाही उपाय फायदेशीर
राग आला तेव्हा आकडे मोजायला सुरुवात करा. हा एक फार चांगला उपाय मानला जातो. याने तुम्हाला शांतता मिळेल. इतकेच नाही तर राग नियंत्रित करण्यासाठी तुम्हाल मोठ्ठा श्वासही घेऊ शकता. याने तुमचाय राग दूर पळेल. जास्तीत जास्त लोक तेव्हाच रागावतात जेव्हा समोरची एखादी व्यक्ती आपल्या मनानुसार काम करत नाही. पण हे लक्षात ठेवा की, तुम्ही स्वत:ला कितीही बदलू शकता. बदलालही. पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुमच्या रागाने तुम्ही समोरच्या व्यक्तीला बदलाल तर तुम्ही चुकीचा विचार करताय.