सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे घरी बसण्याशिवाय लोकांकडे कोणताही पर्याय नाही. सतत घरी बसल्यामुळे आपोआपच शारीरिक स्थितीवर परिणाम होतो. सगळ्यात जास्त आजार होण्याचा धोका ३० च्या पुढील वयोगटातील लोकांना जास्त असतो. फक्त चुकिचं खाणंपिणंच नाही तर इतर अनेक गोष्टींमुळे तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. परिणामी कॉलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या आजारांचा सामना करावा लागतो. पण आजार उद्भवल्यानंतर प्रकृतीकडे लक्ष देण्यापेक्षा आधीच काही गोष्टींची काळजी घेतल्यास जीवघेण्या आजारांपासून वाचता येऊ शकतं.
लठ्ठपणामुळे वाढतं कॉलेस्ट्रॉल
तेल, बटर अशा फॅटफुल आहारामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. वजन वाढल्यामुळे शरीरातील गुड कॉलेस्ट्रॉल कमी होतात आणि बॅट कॉलेस्ट्रॉल वाढतं जातं. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, स्ट्रोक, टाइप-2 डायबिटीज कॅन्सर यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका असतो.
व्यायाम न करणं
अनेकजण लॉकडाऊनमुळे खूप आळसावलेले आहेत. व्यायाम न केल्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढत जातं. WHO ने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून १५० मिनिटं व्यायाम करायला हवा. त्यामुळे शरीर निरोगी राहून तुम्ही फिट राहता.
ताण-तणाव वाढणं
सध्या सगळ्यांनाच कोरोनाच्या माहामारीचा ताण आला आहे. त्यातल्या त्यात वैयक्तीक आयुष्यातील समस्या नोकरी, व्यवसाय या संबंधी गोष्टींचे टेंशन घेतल्यामुळे ताण- तणाव वाढू शकतो. परिणामी शरीरातील कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून हृदयविकारांचा सामना करावा लागू शकतो. सिगारेट आणि मद्यपान केल्यामुळे फुफ्फुसांची अवस्था खराब होते. त्यामुळे कॅन्सरचा आजार होऊ शकतो. तसंच या व्यसनांमुळे कॉलेस्ट्रॉल सुद्धा वाढून गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
(दातदुखीमुळे अस्वस्थ होण्यापेक्षा आधीच 'या' उपायांनी दात, हिरड्या ठेवा निरोगी)
(घरी जाताना सोबत येऊ शकतो कोरोना, संसर्ग टाळण्यासाठी प्रवासादरम्यान 'अशी' घ्या काळजी)