- अमित सारडाशरीराला येणारी दुर्गंधी ही काही असामान्य समस्या नाही. हे नैसर्गिक आहे. मात्र ही समस्या चारचौघांत लज्जित व्हायला भाग पाडू शकते. विशेषत: तुम्ही एखाद्या स्नेहमेळाव्यात अथवा एखाद्या क्लायंटसोबतच्या मीटिंगमध्ये असता तेव्हा तुम्हाला ती लज्जित करू शकते. खूप घाम येणे हे या समस्येचे कारण असल्याचे मानले जाते. मात्र हे सत्य नाही. तर घामाच्या अतिसंवेदनशील ग्रंथींमुळे शरीराला दुर्गंधी येते. उष्ण, दमट वातावरणात शरीरावर वेगाने वाढणारे जीवाणू आणि घाम यांच्या मिश्रणातून हा दर्प तयार होतो. दैनंदिन स्वच्छता आणि चांगला संतुलित आहार तुमचे शरीर ताजेतवाने आणि दिवसभर सुगंधी ठेवण्यात साहाय्यक ठरतो. ज्यांना शरीराच्या दुर्गंधीची समस्या सतावते त्यांनी एखाद्या दिवशी आंघोळ टाळण्याचा विचारही करू नये. त्याशिवाय ते धूम्रपान करत असतील किंवा मद्यपान अथवा कॅफेनचे सेवन करत असतील आणि त्यानंतर पाणी पीत असतील तर त्यांनी असे करणे तातडीने थांबवायला हवे.पुढे दिलेल्या काही उपाययोजनांचा अवलंब केला तर शरीराच्या दुर्गंधीला काही प्रमाणात आळा घातला जाऊ शकतो. मात्र त्यामुळे ही समस्या केवळ एका टप्प्यापर्यंत आटोक्यात ठेवता येईल. त्याशिवाय काही साध्या घरगुती मिश्रणांनी शरीरावर जीवाणूंची पैदास होणे रोखता येईल. हेच जीवाणू शरीराच्या दुर्गंधीचे मूळ कारण आहेत.।बेकिंग सोडा+लिंबाचा रसबेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांचं मिश्रण शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठीचे आदर्श मिश्रण आहे. बेकिंग सोडा हे उत्तम नैसर्गिक शोषक आहे. हे शरीरावरील जीवाणूंचा नाश करते तर लिंबाचा रस शरीरावरचा तो भाग तेलमुक्त, स्वच्छ आणि ताजातवाना करतो.कसे वापरावे - १ टेबलस्पून लिंबाचा रस १ टेबलस्पून बेकिंग सोड्यामध्ये मिसळावा. हे मिश्रण तुमच्या काखेत तसेच शरीरावरील अधिक घाम येणाऱ्या भागांवर लावावे. १0-१५ मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवावे, त्यानंतर ते थंड पाण्याने धुऊन काढावे. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून दोन वेळा असे करावे. टी ट्री इसेंशियल आॅइलटी ट्री इसेंशियल आॅइलमध्ये नैसर्गिक जीवाणूनाशक आणि जंतुनाशक गुणधर्म आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूंवर नियंत्रण राहते. कसे वापरावे - तुमच्या आंघोळीच्या पाण्यात या तेलाचे ३-४ थेंब टाका आणि या पाण्याने तुमचे शरीर स्वच्छ करा. टी ट्री इसेंशियल आॅइलचे २-३ थेंब २ टेबलस्पून पाण्यात टाका. हे मिश्रण तुमच्या काखेत तसेच शरीरावर अतिरिक्त घाम येणाऱ्या भागांवर लावा. हे तेल आणि पाण्याचे मिश्रण दिवसभर गरजेनुसार स्प्रेच्या स्वरूपातही वापरता येईल. ।शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका होण्यासाठी काही अतिरिक्त टिप्सदररोज आंघोळ करा.स्वच्छ सुती कपडे वापरा. प्रत्येक वेळी वापरलेले कपडे धुऊन काढा. आंघोळीनंतर घाणेरडे अथवा आधी वापरलेले कपडे वापरू नका. रसायनेमिश्रित साबण अथवा डिओड्रंट वापरण्याचे टाळा. त्याऐवजी टी ट्री इसेंशियल आॅइल अथवा नैसर्गिक डिओड्रंट किंवा गवती चहापासून तयार केलेले तेल (लेमनग्रास आॅइल) वापरा. बंदिस्त पादत्राणे अधिक काळासाठी वापरणे टाळा.भरपूर पाणी प्या. अतिरिक्त धूम्रपान टाळा; तसेच कॅफेन, मद्यपान, लसूण, कांदा किंवा मसाल्यांचे अतिरिक्त सेवन टाळा. तुमच्या काखा तसेच शरीरावरील घाम येणाऱ्या अन्य भागांतील केस नियमितपणे काढा. कारण या ठिकाणी जीवाणूंची निर्मिती होण्यासाठी पोषक वातावरण असते; तसेच येथे घामही टिकून राहतो. (वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट)
शरीराच्या दुर्गंधीशी सामना कसा करावा
By admin | Published: June 08, 2017 2:31 AM