जगभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे. कोरोनामुळे लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वयस्कर आणि रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त आहे. कोरोना व्हायरसचा फुप्फुसांवर परिणाम होत असतो. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांना कोरोनाच्या संक्रमणाचा जास्त धोका असतो.
आरोग्य तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अस्थमाच्या रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे अशा रुग्णांना व्हायरल संक्रमणाचा धोका अधिक असतो. कारण अस्थमाच्या रुग्णांना आधीच श्वसनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत जर कोरोनाचे संक्रमण झाले तर शारीरिक स्थिती खराब होण्याची शक्यता असते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली असेल तर संक्रमणाचा सामना करण्यासाठी रुग्णाला पुरेशी शक्ती मिळत नाही. त्यामुळेच अस्थमाच्या रुग्णांना घरी राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
अस्थमाच्या आजारात कॉर्टिजोन स्प्रे किंवा कॉर्टिजोन टॅबलेटचा वापर सामान्यपणे केला जातो. त्यामुळे एंटी-इंफ्लेमेट्री प्रभाव पडतो. परिणामी रुग्णाच्या फुप्फुसांमधील त्रास कमी करण्यासाठी मदत होते. नियमीत औषधं घेतल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अस्थमाच्या रुग्णांनी कॉर्टिजोन औषधांबाबत डॉक्टरशी चर्चा करायला हवी. कारण त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होऊ शकतो. कार्टीजोनयुक्त औषधांच्या संक्रमणाबाबत परिणाम समोर आलेले नाहीत. जर्मन सोसायटी फॉर न्यूमोलॉजी एंड रेसपिरेटरी मेडिसिनमधील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अस्थमा रुग्णांनी कार्टीजोन स्प्रे पूर्णपणे बंद करू नये. (हे पण वाचा-वाढती उष्णता आणि पित्तामुळे तुम्हालाही होऊ शकतो तोंडातील अल्सर; 'असा' करा बचाव)
ज्या रुग्णांना आधीपासून श्वसनासंबंधी समस्या असतात. त्यांचं शरीर व्हायरसचा सामना करू शकत नाही. डॉयचे वेले यांच्या रिपोर्टच्या नुसार फुफ्पुस आधीच कमकुवत असल्यामुळे हा धोका वाढत जातो. व्हायरस आणि बॅक्टेरियाचं इन्फेक्शन फुप्फुसांसाठी नुकसानकराक ठरू शकतं. तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अस्थमाच्या रुग्णांनी पहिल्यापासूनच इंफ्लुएंजा आणि न्यूमोकॉक्कल वॅक्सीन घ्यायला हवी. याशिवाय अस्थमाच्या रुग्णांनी घरातील लोकांसोबतही सोशल डिस्टेंसिंग ठेवायला हवं. तसंच स्वच्छतेसंबंधी गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. (हे पण वाचा-पचनक्रिया कितीही असेल खराब; तरी 'या' उपायांनी पोटाचे विकार नक्की राहतील लांब...)