शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

थंडीत ब्लड प्रेशर हाय होत असेल तर वेळीच करा 'हे' उपाय, अन्यथा निर्माण होईल मृत्यूचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 2:56 PM

हिवाळ्यात रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यायामाचा अंतर्भाव केल्यास आणि जीवनशैलीत (Lifestyle) थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

पूर्वी उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा फक्त वृद्धांना होणारा आजार समजला जायचा; मात्र गेल्या काही वर्षांत हानिकारक जीवनशैलीमुळे तरुणांनाही उच्च रक्तदाबाचा विकार होऊ लागला आहे. उच्च रक्तदाब व्यक्तीस हळूहळू मृत्यूच्या दारात घेऊन जातो. म्हणूनच या विकाराला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. हिवाळ्यात रक्तदाब कमी-जास्त होत राहतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यायामाचा अंतर्भाव केल्यास आणि जीवनशैलीत (Lifestyle) थोडाफार बदल केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. 'झी न्यूज हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातल्या नॉर्मल रक्तदाबापेक्षा जास्त रक्तदाब होय. अनेकदा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे वेळेवर उपचार न केल्याने हृदयविकार होऊ शकतो. जीवनपद्धती, राहणीमान, खाणं-पिणं आदींच्या वाईट सवयी, मद्यपान, लठ्ठपणा आणि ताणतणाव ही उच्च रक्तदाबाची कारणं आहेत. त्यामुळे आपला रक्तदाब नियमितपणे तपासणं आणि तो नियंत्रित राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात आल्याचा (Ginger) वापर करणं उपयुक्त ठरतं. आल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मिठाशिवाय जेवण पूर्ण होत नाही. तो जेवणाचा अविभाज्य घटक आहे; मात्र ते प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात खाल्लं गेलं, तर शरीरासाठी त्रासदायक असतं. हिवाळ्यात उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल, तर आहारातलं मिठाचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवणात मिठाचं प्रमाण वाढलं तर रक्तदाब वाढण्यासह आणखीही काही त्रास होऊ शकतात.

जंक फूड आणि तेलकट अन्न खाणं टाळणं केव्हाही चांगलं. तसंच धूम्रपान आणि मद्यपान करणंही शरीरासाठी हानिकारक आहे. या वाईट सवयींमुळे रक्तदाब वाढतो. आरामदायी जीवनशैली आणि लठ्ठपणा यांमुळेही उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे शारीरिक हालचाल वाढली तर आपला रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. जीवनशैली निरोगी असेल, तर उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्यामुळे दररोज व्यायाम करावा किंवा दररोज ३० मिनिटं चालावं. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसभर शारीरिक हालचाली सुरू ठेवणं आवश्यक आहे.

वाढलेलं वजन अनेक रोगांना निमंत्रण देतं. लठ्ठपणामुळे (Fat) अनेक आजार होतात. वजन जास्त वाढलं, तर उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढतो. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नॉर्मल राखण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, isometric handgrip strengtheners ने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. याद्वारे आठ आठवड्यांत रक्तदाब 8 ते 10 mmHg कमी होऊ शकतो; पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्या दैनंदिन जीवनात याचा समावेश करावा. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं. असं केल्यास दीर्घायुषी होण्यास नक्की मदत होऊ शकेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स