शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

दालचिनीच्या सेवनाने होतात 'हे' ६ फायदे; कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास होईल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 8:08 PM

भारतीय मसाल्यांच्या पदार्थात दालचिनीला खूप महत्व आहे. दालचिनीचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून  रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असावा  असं वारंवार तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. भारतीय मसाल्यांच्या पदार्थात दालचिनीला खूप महत्व आहे. दालचिनीचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.

आज आम्ही तुम्हाला दालचिनीच्या सेवनाने आरोग्यदायी  फायदे सांगणार आहोत.  दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात मॅगनिज, लोह आणि काही प्रमाणात कॅल्शियम असतं. दालचिनीत भरपूर औषधी गुणधर्म आहेत. लवंगेप्रमाणे दालचिनीचंही तेल काढलं जातं. सिनॅमल्डिहाइड, सिनॅमिल अँसिटेट आणि सिनॅमिल अल्कोहोल ही या तेलामधील प्रमुख रसायनं आणि इतर काही रसायनं दालचिनीला औषधी गुणधर्म देण्यास कारणीभूत असतात.

दालचिनी रोज आहारात असेल तर रक्तातील साखरेची पातळी, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स कमी होण्यास मदत होते. स्नायूंच्या पेशीतील इन्शुलिन संदेश पद्धतीत सुधारणा होते. हृदयरोगाचा धोका टळतो बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव पडून बहुतेकजण हृदयरोगाने त्रस्त आहेत.

दालचिनीत अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्याने रोज सेवन केल्यास हे शरीरात खराब कोलोस्ट्रॉल जमा होण्यापासून वाचवतात. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो. उच्च रक्तदाब, हृदयविकार, अकाली वार्धक्य अशा व्याधींना दूर ठेवायला होतो.  

सांधेदुखीवर दालचिनीच्या तेलाचा उपयोग होतो. पित्ताच्या उलट्या, मलावरोध, आम अतिसार, डोकेदुखी अशा बर्‍याच रोगांवर होतो. पण दालचिनी उष्ण असते. त्यामुळे तिच्यात औषधी गुणधर्म भरपूर असले तरी  सेवन अल्प प्रमाणातच केलं पाहिजे. 

आज लठ्ठपणाच्या समस्या अनेकांना भेडसावत आहेत. कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू होत असलेले लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत. अशा स्थितीत अनेक उपायांपैकी दालचिनीदेखील वजन कमी करण्यास उपयुक्त असल्याचे अनेक संशोधनांतून लक्षात आले आहे.  यासाठी सकाळी एक ग्लास गरम पाण्यासोबत एक चमचा दालचिनी घ्या. 

अशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास एक चमचा दालचिनी घेऊन ती पाण्यात उकळा. हे पाणी चहाप्रमाणे प्या. यामुळे थकवा दूर होऊन ऊर्जा मिळेल.

कोरोनाच्या भीतीने घरात राहणाऱ्या लोकांमध्ये कोरोना संक्रमणाचं प्रमाण जास्त; संशोधनातून खुलासा

CoronaVirus News : दिलासादायक! महाराष्ट्रातील 'या' शहरांत सगळ्यात आधी दिली जाणार कोविड 19 ची लस

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न