निराश होणे, राग होणे किंवा चिडचिड करणे तसेच एखाद्या गोष्टींची चिड येणे कुणालाही चांगलं वाटत नाही. खरंतर असं वागणाऱ्या लोकांना दूर ठेवलं जातं किंवा त्यांच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं जात नाही. अनेकजण जर अशा लोकांपासून दूरही पळतात. पण एका रिसर्चने चिडचिड करण्याचे किंवा रागिट स्वभाव असण्याचे काही फायदे समोर आणले आहेत. एका रिसर्चनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये चिडचिडपणा जास्त असतो. असं दोघांच्याही विकासात अंतर असण्याच्या कारणाने होतं. पण एका रिसर्चनुसार, चिडचिड किंवा तिरस्कार करण्यासारखी नकारात्मक भावना देखील आपल्यासाठी चांगली असते. आता तुम्ही म्हणाल हे कसं? चला तर जाणून घेऊ याचं उत्तर...
या रिसर्चचे मुख्य लेखक म्हणाले की, मनुष्याच्या विकासासोबतच या भावनेचाही विकास झाला आहे. याने आपला अनेक जुन्या आजारांपासून बचाव होतो. हा रिसर्च लंडनच्या एका मेडिकल स्कूलमध्ये करण्यात आला. अभ्यासक सांगतात की, चिडचिडपणा, एखाद्या गोष्टीची चिड येणे किंवा राग येणे या भावनांमुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन विरोधात आपल्या शरीरात प्रतिक्रिया होते.
हे नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी जवळपास २५०० लोकांशी ऑनलाइन संवाद साधला. त्यांना ७५ वेगवेगळ्या गोष्टी देण्यात आल्या, काही सांगण्यात आल्या आणि काही करायला सांगण्यात आल्या. त्यातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, या गोष्टींमुळे कुणाला किती चिड, किळस किंवा राग आला. यात घाण, घाणेरडे टॉयलेट्स, शरीराची दुर्गंधी, जनावरांकडून होणारे आजार, जखमेतील पस, अनैसर्गिक लैंगिक व्यवहार, खराब बॉडी शेप इत्यादींचा समावेश होता.
यातून असं आढळलं की, यावर महिलांची प्रतिक्रिया पुरुषांच्या तुलनेत जास्त होती. त्यांना या गोष्टी जास्त खराब वाटल्या. यातील जखमेतील पस याबाबत लोकांना सर्वात जास्त किळस आली. महिलांनी सर्वात जास्त सेक्शुअल बिहेविअर आणि जनावरांकडून होणारे आजार सर्वात वाईट वाटले. अभ्यासकांनी सांगितलं की, याने महिलांना प्रजननावेळी फायदा होतो. त्या या परिस्थितींपासून दूर राहतात. यामुळे त्यांचं होणारं बाळ इन्फेक्शन्स आणि इतर आजारांपासून दूर राहू शकतं.
म्हणजे ज्या गोष्टींची आपल्याला चिड येते त्या गोंष्टींपासून आपण दूर राहतो. खासकरुन महिला अशा गोष्टी टाळतात किंवा अशा गोष्टींच्या संपर्काच राहत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यास त्यांना मदत होते. खरंतर राग किंवा चिडचिड ही चांगली गोष्ट नाही. पण मुळात हा काही लोकांचा स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. पण हे चिडचिड करण्याचे किंवा राग करण्याचे हे फायदे आपोआप होत असतील तर आपला फायदाच आहे.