- मयूर पठाडेकाही घटना अशा असतात, ज्या आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाहीत बºयाचदा आपल्याला त्या विसरल्यासारख्या वाटत असल्या तरी आपल्या सुप्त मनात त्या कायम राहतात आणि आपलं आयुष्य त्या हळूहळू पोखरत राहतात. त्याचंच रुपांतर मग ‘पीटीएसडी’, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसआॅर्डर या आजारात होतं.हा आजार म्हणजे काही मानसिक प्रॉब्लेम आहे, असं समजलं जातं, बºयाचदा त्याकडे दुर्लक्षही केलं जातं, पण पुर्वायुष्यातील घटनांचा आघातामुळे झालेला हा विकार असू शकतो. तो वेळीच ओळखता आला पहिजे.बºयाचदा त्या व्यक्तीच्या परिचितांच्या आणि जवळच्या माणसांना या आजाराची लक्षणं लवकर लक्षात येऊ शकतात.काय आहेत या आजाराची लक्षणं?१- ‘पीटीएसडी’ हा आजार झालेली व्यक्ती अनेक घटना, प्रसंग गोष्टी खूप लवकर विसरतात. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलताहात, काही गोष्टी त्यांना सांगताहात, तर दुसºयाच मिनिटाला ती गोष्ट ते विसरलेले असू शकतात. समजा तुम्ही एखादा फोन नंबर, पत्ता तुम्ही त्या व्यक्तीला सांगितला, तर लगेच ते तो विसरू शकतात.२- अशा व्यक्तींचं कॉन्सट्रेशन अतिशय विक असतं. कोणत्याही गोष्टीवर ते जास्त काळ लक्ष एकाग्र करू शकत नाहीत. एखादं भाषण ते एकाग्रतेनं ऐकू शकत नाहीत. छोट्या छोट्या कारणांनीही त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं. उदाहरणार्थ डोक्यावर फिरत असणारा पंखा, भिंतीवर, घरात भिरभिरत असणारी माशी, थोडासा आवाज..३- अपरिचित वातावरणात अशा लोकांना झोप येत नाही. ते जागेच असतात. हा निद्रानाशाचा त्रास आहे, असा समज काही वेळा होतो, त्यावरचे औषधोपचारही काही वेळा घेतले जातात, पण त्यासाठी मानसतज्ञांचा सल्लाही घेतला पाहिजे.४- अशा व्यक्ती इमोशनली खूपच विक असतात. त्यांचे मूड कायम आणि पटापट स्विंग होत असतात. हा माणूस एका क्षणात आग्यावेताळ कसा काय झालं, यामागे काही योग्य कारण असेलच असंही नाही..
आपल्याला विसरभोळेपणाचा ‘आजार’ झालाय हे कसं ओळखाल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 6:00 PM
बघा, ही चार लक्षणं आपल्यांत किंवा आपल्या परिचितांमध्ये दिसताहेत का?
ठळक मुद्दे‘पीटीएसडी’ हा आजार झालेली व्यक्ती अनेक घटना, प्रसंग गोष्टी खूप लवकर विसरतात.अनेक गोष्टी ते बोलता बोलता विसरू शकतात.अशा व्यक्तींचं कॉन्सट्रेशन अतिशय विक असतं. डोक्यावर फिरत असणारा पंखा, भिंतीवर, घरात भिरभिरत असणारी माशी, थोडासा आवाज त्यांना विचलित करू शकतो..