सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जीवघेण्या आजारांचा सामना लोकांना करावा लागतो. पण रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल आणि शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित असेल तर आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. शरीरातील कार्य सुरळीत होण्यासाठी ऑक्सिजन आणि पोषक तत्व असणं गरजेचं असतं. हार्मोन्सचं संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी रक्त शुद्ध असणं मह्त्वाचं आहे.
अनेकदा आपल्या आहारातील काही पदार्थांमुळे रक्तप्रवाहावर परिणाम होत असतो. जे शरीरासाठी नुकसानकारक घटक असतात. त्यांना टॉक्सिन्स असं म्हणतात. शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी रोजच्या वापरातील काही गोष्टींचा आहारात घेऊन तुम्ही रक्ताचे शुद्धीकरण करू शकता. आज आम्ही तुम्हाला याच पेयांबद्दल सांगणार आहोत.
कोथिंबिर आणि पुदिना
कोथिंबिर आणि पुदिना यांचा आहारात समावेश केल्याने पोटाचे अनेक आजार दूर होतात. आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहारात कोंथिबिरीसह पुदिन्याचा समावेश करणं लाभदायक ठरेल. त्यासाठी पुदिना आणि कोथिंबीरीचा चहा करून प्या. हा चहा तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त १० मिनिट वेळ लागेल. गरम पाण्यात कोंथिबीर आणि पुदिना घालून उकळून हे पाणी गाळून प्या. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होईल आणि रक्ताचं शुद्धीकरण सुद्धा होईल.
लिंबाचा रस
लिंबाच्या रसाचे अनेक फायदे आहे. त्यात अनेक एसिडीक गुण असतात. त्यामुळे शरीरातील रक्ताचे शुद्धिकरण करण्यासाठी लिंबाचा उपयुक्त ठरतो. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून प्या. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स मुत्रावाटे निघून जातात.
तुळस चहा
तुळशीचे अनेक औषधी गुण तुम्हाला माहित असतील. तुळशीत अनेक एंटीबॅक्टीरियल आणि एंटी व्हायरस गुण असतात. शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होण्यासाठी तुळशीची पानं चावून खा. याशिवाय गरम पाण्यात तुळशीची पानं घालून चहा प्यायल्याने आजारांपासून लांब राहता येईल.
कडुलिंब
आपल्या रक्ताला शुध्द करण्यासाठी कडूलिंबाच्या पिकलेल्या १० लिंबोळ्याचा रस शोषून घेतल्याने रक्त शुद्ध होते. याच सोबत कडूलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने देखील रक्त शुद्धीकरण होते. त्यासाठी गरम पाण्यात ही पानं घालून उकळून घेऊन गाळून हा रस प्याल तर फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-Coronavirus : रूग्ण बरा झाल्यावरही त्याच्या शरीरात किती राहतो कोरोना व्हायरस? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत....)