उन्हाळा आला की, वेगवेगळ्या आरोग्यदायक समस्यांना प्रत्येकालाच तोंड द्यावं लागतं. अनेक रोगांसोबतच या दिवसात नाकातून रक्त येणे ही सर्वात मोठी समस्या अनेकांना भेडसावते. पण यामुळे अनेकांची अचानक भंबेरी उडते. अनेकजण घाबरतात. पण नाकातून येणारं रक्त प्रत्येकवेळी आरोग्यासाठी घातक असतेच असे नाही. त्यामुळे घाबरू नये.
नाकातून रक्त येण्यावर घरच्या घरी उपचार करता येणे शक्य आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाकातून रक्त येण्याच्या समस्येचे प्रमाण जास्त असते. नाकाच्या अगदी बाहेरच्या भागात एक नस असते. ही नस फुटली किंवा पडल्यामुळे तिच्यावर आघात झाला तर नाकातून रक्त येते. नाकातून होणार्या रक्तस्त्रावासोबतच काही वेळा कान आणि तोंडातूनही रक्त येऊ शकते.
नाकातून रक्त येण्याची अनेक कारणं आहेत. त्यातले काही कारणं म्हणजे कोरडेपणा, नाक टोचणे, पडल्यामुळे नाकाला दुखापत होणे, अँस्पिरिनसारख्या औषधांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर, लहान मुलांनी नाकात पेन्सिल, पेन किंवा एखादी वस्तू घातल्याने दुखापत झाल्यास, जखमा, अँलर्जी, जंतूसंसर्ग, उच्च रक्तदाब, रक्तात होणार्या गुठळ्यांच्या तक्रारी ही नाकातून रक्त येण्याची काही कारणे आहेत. त्यामुळे जर भविष्यात कधी नाकातून रक्त आलं तर घाबरण्याचं कारण नाही.
उन्हाळ्यात नाकातून रक्त आल्यास हे करा
1) थंड पाणी डोक्यावर टाकल्यास नाकातून रक्त येणे बंद होतं.2) नाकातून रक्त येत असेल तर नाका ऐवजी तोंडाने श्वास घ्यावा.3) कांदा कापून त्याचा दर्प घेतल्यास नाकातून येणारं रक्त बंद होतं.4) बेलाच्या पानांचा रस पाण्यात मिसळून पिल्याने फायदा होतो. 5) नाकातून रक्त येत असल्यास बर्फ कपड्यात लपेटून नाकाजवळ ठेवल्यास रक्त येणे बंद होतं.