- मयूर पठाडेभारतात डायबेटिसचे पेशंट किती आहेत? असावेत? त्याच्या आकडेवारीत खरंतर जाण्यात काहीच अर्थ नाही. यासंदर्भात भारताची जगात काय ओळख आहे, हे पाहिलं तर त्यातली सत्यताही पटेल. ‘इंडिया इज द डायबेटिस कॅपिटल आॅफ द वर्ल्ड’.. ही आहे भारताची ओळख!जगात सर्वाधिक डायबेटिकचे पेशंट भारतात आहेत. अनेक कारणं आहेत, ज्यामुळे भारतात डायबेटिसचे पेशंट प्रचंड प्रमाणात आढळतात. आपली बदलत चाललेली लाइफस्टाईल, प्रकृतीकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती, काहीही झालं तरी ‘चाल से’ अशी वृत्ती.. खाण्यापिण्यात कायम असणारे पदार्थ.. यामुळे भारतात डायबेटिसची दिवसेंदिवस वाढच होत आहे.. पण त्यापेक्षाही आणखी एक महत्त्वाचे कारण आहे आणि ते फारच धक्कादायक आहे. डायबेटिस नियंत्रणात राहावा म्हणून तुम्ही सर्वतोपरी तुम्ही काळजी घेत असाल, इन्सुलिनची इंजेक्शन्सही वेळेवर घेत असाल.. पण इन्सुलिन घेण्याची तुमची पद्धत कशी आहे? ती जर चुकीची असेल, तर तुमचा डायबेटिस नियंत्रणात राहाणं तर सोडाच, उलट तो वाढत जाण्याचीच शक्यता जास्त आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या अभ्यासाने डायबेटिक पेशंट्सच्या डोळ्यांतही झणझणीत अंजन पडेल. नेमकं चुकतं कुठे?
१- इन्सुलिन थेरपीवर असलेले जवळपास सारेच डायबेटिक पेशंट इन्सुलिन घेण्यासाठी चुकीची पद्धत अवलंबतात.२- इन्सुलिनची इंजेक्शन्स आपल्या शरीरावर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेता येतात. उदाहरणार्थ मांडीवर, दंडावर, पार्श्वभागावर किंवा पोटावर.. चुकीच्या जागी जर ही इंजेक्शन्स घेतली तर त्यामुळे तुमचा डायबेटिस ताब्यात येण्याऐवजी वाढण्याचीही शक्यता आहे. ३- अभ्यासकांचं म्हणणं आहे, जवळपास ७५ टक्के लोकांची इन्सुलिन घेण्याची पद्धत चुकीची आहे. त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.४- एकतर इन्सुलिनची इंजेक्शन्स घेण्याची जागा अगदी परफेक्ट असली पाहिजे. त्याशिवाय इंजेक्शन घेण्याची ही जागा सिस्टिमॅटिक पद्धतीने रोटेशपनमध्ये बदलली पाहिजे आणि इंजेक्शनची निडलही सातत्यानं बदलली पाहिजे. ५- इन्सुलिनचं इंजेक्शन कसं घ्यावं आणि द्यावं यासंदर्भात पेशंटसहित डॉक्टर, नर्स यांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि त्यासंदर्भात वेळोवेळी त्यांचं प्रशिक्षणही झालं पाहिजे. तसं झालं तर डायबेटिस नक्कीच कंट्रोलमध्ये राहू शकतो.६- यासाठी अभ्यासकांनी एक प्रयोग केला. इन्सुलिनची इंजेक्शन्स कुठे घ्यावीत, कधी घ्यावीत, कशी घ्यावीत, त्याची नेमकी जागा काय, रोटेशन कसं असावं, यासंदर्भात रुग्णांना प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांची पुन्हा चाचणी घेतली. ७- अभ्यासकांना त्यात आश्चर्यकारक प्रगती दिसून आली. या पेशंट्सच्या शरीरातील ब्लड ग्लुकोजचं प्रमाण पहिल्यापेक्षा १५ टक्क्यांनी, फास्टिंग ब्लड ग्लुकोज १२ टक्क्यांनी तर पोस्ट मिल ग्लुकोज तब्बल १९ टक्क्यांनी कमी झालेलं आढळलं!त्यामुळे आता यापुढे इन्सुलिनची इंजेक्शन्स घेताना या गोष्टींची नीट काळजी घ्या, स्वत:ही त्यासंदर्भात प्रशिक्षण घ्या आणि इतर कोणाकडून इंजेक्शन घेत असाल तर त्यांनाही त्याबाबतची ‘समज’ द्या..