Lemon Water Weight Loss : वजन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त लोक लिंबू पाण्याचं सेवन करतात. अनेकांना असं वाटतं की, लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि मग वजन कमी होतं. पण खरंच लिंबू पाण्याने वजन कमी होतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं?
कॅलरी कमी होतात
लिंबू पाणी थंड प्याल तर त्यात कॅलरी फार कमी असतात. पाण्यात झीरो कॅलरी असतात आणि एका लिंबूमध्ये केवळ 17 कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान थंड लिंबू पाण्याचं सेवन करणं एक चांगला पर्याय मानला जातो.
मेटाबॉलिज्म मजबूत होतं
लिंबू पाण्यामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होतं, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. जर शरीर हायड्रेट राहिलं तर याने तुमच्या मायटोकॉन्ड्रियाला योग्यप्रकारे काम करण्यास मदत मिळते.
भूक कमी लागते
लिंबू पाण्याचं सेवन केल्याने तुमची चुकीचे पदार्थ खाण्याची सवय कमी होते. वजन कमी करण्यासाठी जेवणादरम्यान लिंबू पाण्याचं सेवन करा, जेणेकरून भूक नियंत्रित केली जावी. याचं कारण म्हणजे लिंबू पाण्यात कॅलरीचं प्रमाण कमी असतं.
विषारी पदार्थ बाहेर निघतात
थंड लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि याने शरीर क्लिंज होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
किती लिंबू पाणी प्यावं?
ज्या लोकांचं वजन 68 किलो आहे, त्यांनी 8 ते 12 मिली थंड लिंबू पाण्याचं सेवन करावं आणि ज्या लोकांचं वजन 68 किलोपेक्षा अधिक आहे. त्यांनी रोज 2 वेळा लिंबू पाण्याचं सेवन करावं.
लिंबू पाणी जास्त पिण्याचे नुकसान
लिंबात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी वाढलं तर याचा प्रभाव अनेक अवयवांवर पडतो. त्यामुळे अनेक डॉक्टर याचं कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतात.
पोटदुखी
व्हिटॅमिन सी जास्त वाढल्याने पोटात अॅसिडीक सिक्रीशन वाढण्याची भीती असते. कारण याने अॅसिडची शक्यता जास्त वाढते. हे समस्या इथेच थांबत नाही, उलट जास्त लिंबू पाणी प्यायल्याने उलटी, जुलाब आणि मळमळ होण्याची समस्याही होऊ शकते. अनेक लोक गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्सने पीडित असतात त्यांनी लिंबू पाणी कमी प्यायला हवं.
तोंडात फोडं
लिंबाच्या मदतीने अनेकदा तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि दातांची स्वच्छताही केली जाते. पण जर लिंबू पाणी प्रमाणापेक्षा जास्त सेवन कराल तर यातील सायट्रिक अॅसिड ओरल टिश्यूजमध्ये सूज निर्माण करतं. ज्यामुळे तोंडात फोडं येतात आणि जळजळ होते.
दात कमजोर होतात
प्रयत्न करा की, लिंबू पाणी पित असाल तर स्ट्रॉ चा वापर नक्की करा. कारण याने लिंबाच्या रसाचा संपर्क दातांशी येणार नाही. असं केल्याने दात कमजोर होणार नाहीत.