कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या जीवनात खूप बदल घडून आला आहे. लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या अनेकांना ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. आपली नोकरी, व्यवसाय, आर्थीक गोष्टी, रिलेशनशिप याबाबतीत विचार करून अनेकांना नैराश्य आले आहे. एकंदरीच कधीही न उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देत असताना अनेकांना मानसिक आजारांचे शिकार व्हावं लागत आहे.
यात महिलांचा सुद्धा समावेश आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान घरातील सगळे सदस्य एकत्र असल्यामुळे अनेकांच्या घरी आनंद आहे तर काहींना याच गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. रिसर्चमधून दिसूनआले की, कोरोनाच्या महामारीमुळे सर्वाधिक महिला या घरगुती हिंसेच्या शिकार होत आहेत.
फक्त भारतातच नाही तर जगभरातील महिलांना घरगुती हिसेंला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमध्ये पुरूषांचं घरी असणं, आर्थीक संकटं, अपेक्षा पूर्ण करणं यांमुळे काही महिलांना लॉकडाऊनच्या दिवसात घरी राहणं कठीण वाटत आहे. ज्या पुरुषांना मद्यपान करण्याची सवय आहे. त्यांना दारू न मिळाल्यामुळे होणारी चिडचिड, राग, हिंसक वृत्ती याचा त्रास घरातील महिलांना होत आहे. कारण अनेक ठिकाणी स्वतःचं फ्रस्टेशन काढण्यासाठी पुरुष महिलांना शिवीगाळ करत आहेत तर कधी मारहाण सुद्धा करत आहेत.
दुसरीकडे घरातील इतर सदस्यांच्या महिलांकडून खूपच अपेक्षा असतात. नेहमी खाण्यापिण्यासाठी काहीतरी वेगळं तयार करण्याचा आग्रह केला जातो. अशात कोणाकडूनही मदतीचा हात मिळत नाही. त्यामुळे कौटुंबिक मतभेद होतात. त्यामुळे महिला स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. अशा स्थितीत महिलांना थकवा येणं, एकटेपणा, रक्तदाबाच्या समस्या, भूक न लागणं, कामात लक्ष नसणं, एंग्जाइटी डिसॉर्डर, ट्रॉमा यांसारख्या शारीरीक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. (हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोना विषाणूंशी लढण्याासाठी मानवी शरीर कधीपर्यंत तयार होणार? जाणून घ्या)
उपाय
या समस्यांवर उपाय म्हणून महिलांनी आपल्या घरच्यांशी शांतपणे चर्चा करायला हवी. त्यामुळे कौटुंबिक मतभेद कमी होण्यास मदत होईल.
घरातील काम सदस्यांमध्ये वाटून घ्यायला हवीत जेणेकरून कामाचा ताण येणार नाही. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवं.
व्यायाम, मेडिटेशन आणि झोप यांकडे लक्ष द्यायला हवं. जेणेकरून नेहमी ताजेतवाने वाटेल.
आपल्या मित्र मैत्रिणींशी फोन करून बोला. तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तींकडे आपलं मन मोकळं करू शकता. त्यामुळे नैराश्य येणार नाही.
(हे पण वाचा-तुमच्यामुळे तुमची मुलंही होऊ शकतात थॅलेसेमियाची शिकार; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)