वातावरणात बदल झाल्यानंतर सर्वच ठिकाणी डास जास्त चावायला सुरुवात होते. संध्याकाळच्यावेळी डास येऊ नयेत म्हणून अनेकजण दारं खिडक्या बंद करतात. त्यामुळे डासांना घरात येण्यापासून रोखता येतं. पण काहीवेळा नंतर घरात हवा येण्यासाठी आपण खिडकी उघडली की, परत डासांचा शिरकाव घरात होतो. डास चावल्यामुळे पुळया येणं, खाज खुजली होण्याची समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला जर डास चावल्यामुळे पुळ्या आल्या असतील तर त्यावर काय उपाय करता येतील याबाबत सांगणार आहोत. घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.
बर्फ
डास चावल्यानंतर त्वचेवर आलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाचा वापर तुम्ही करू शकता. बर्फाचा वापर केल्यामुळे त्वचा सुन्न पडते. त्यामुळे वेदना कमी होतात. यासाठी तुम्ही एका कापडात बर्फाचा लहानसा तुकडा घेऊन त्वचेवर फिरवू शकता. हे करत असताना पाच मिनिटांपेक्षा जास्त ठेवू नका. अन्यथा त्वचा लालसर होण्याची शक्यता आहे.
मध
मधात अनेक एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटी-बॅक्टीरियल गुण असतात. त्यामुळे त्वचेशी संबंधीत तक्रारी दूर करण्यासाठी मधाचा वापर केला जातो. त्वचेवर डास चावल्यानंतर तुम्ही त्या जागेवर हातावर मध घेऊन लावू शकता. काहीवेळा थंड पाण्याने ती जागा स्वच्छ करा. त्यामुळे सूज कमी होते.
एलोवेरा
एलोवेरा त्वचेसाठी खूप फायदेशीर समजलं जातं. एलोवेरामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. डास चावल्यानंतर जखम झाल्यास किंवा सूज आल्यास तुम्ही एलोवेराचा वापर करू शकता. त्यासाठी एलोवेरा जेल डास चावलेल्या हातांना ठिकाणी १० ते १५ मिनिटांनंतर धुवून टाका. ( हे पण वाचा- दात घासताना जीभही करा स्वच्छ; अन्यथा शरीराचं होईल मोठं नुकसान)
बेकिंग सोडा
डास चावल्यानंतर त्वचा चांगली आणि पूर्वरत होण्याासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरेल. बेकिंग सोड्याची पावडर वेदना आणि सुज कमी करण्यासाठी वापरली जाते. बेकिंग सोडा पावडर डास चावलेल्या ठिकाणी लावल्यास फरक दिसून येईल. त्वचा मऊ मुलायम राहील.( हे पण वाचा-लक्षणं दिसत नसतानाही मृत्यूचं कारण ठरत आहे 'सायलेंट हायपोक्सिया', जाणून घ्या)