(Image Credit : www.today.com)
अनेकदा काही लोकांचं पोट फार जास्त फुगलेलं दिसतं. पोट फुगण्याची वेगवेगळे कारणे आहेत. पण त्यातील एक कारण म्हणजे पोटात सूज येणं हे आहे. जेव्हा पोटात गॅस तयार होतो तेव्हा पोटात सूज येण्याची समस्या वाढू लागते. तर अनेकदा पोटात सूज चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे, मासिक पाळीमुळेही येते. याकडे जर जास्त दिवस दुर्लक्ष केलं तर पोट फुगू शकतं. सोबतच पाठदुखी, पोटदुखी या समस्या होऊ लागतात. पोटातील सूज दूर करायची असेल तर तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलममध्ये बदल करावा लागेल. काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे करू शकता.
घाई-घाईने खाऊ नका
(Image Credit : www.abc.net.au)
जर तुम्हाला घाई-घाईने खाण्याची सवय असेल तर ही सवय लवकरात लवकर बदलायला हवी. कारण जेव्हा तुम्ही घाईने काही खाता तेव्हा पोटात अन्नासोबतच हवाही जाते. ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे जेव्हाही काही खाल तेव्हा हळूहळू आणि शांतपणे बारिक चाऊन खावे. याने पोटात गॅस तयार होणार नाही.
मद्यसेवन करू नका
(Image Credit : www.cbsnews.com)
लोकांना नेहमीच असं वाटतं की, जास्त पाणी प्यायल्याने त्यांचं शरीर फुगलेलं दिसतं. पण असं काही नाहीये. उलट पाणी कमी प्यायल्याने शरीर फुगू शकतं. जेव्हा तुम्ही पाणी सेवन करत नाहीत, तेव्हा शरीर तुमच्यात असलेलं पाणी वापरू लागतं आणि ज्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं. अशात तुम्हाला समस्या होऊ शकते. ही समस्या टाळायची असेल तर योग्य प्रमाणात पाणी प्यावे. तसे तुम्ही पाण्यात लिंबाचा टाकूनही सेवन करू शकता. याने पोटातील सूज कमी होण्यास मदत मिळते.
जेवण झाल्यावर फिरा
अनेकजण जेवण झाल्यावर लगेच खुर्चीत बसून राहतात किंवा झोपतात. पण असं केल्याने तुमच्या पोटात सूज येऊ शकते. अशात चांगलं होईल की, जेवण केल्यावर थोडं फिरायला हवं. याने तुम्हाला अन्नही पचेल आणि पोटात सूजही येणार नाही. त्यासोबतच तुम्ही रोज काही वेळ पायी चालावे. याने शरीरही फिट राहतं.
जास्त च्युइंगम खाऊ नये
(Image Credit : selecthealth.org)
जास्त च्युइंगम खाल्ल्यानेही पोटात सूज येऊ शकते. च्युइंगम चावताना पोटात सर्वात जास्त हवा जाते. याने पोटात सूज येऊ लागते. ही सवय लगेच सोडा आणि पोटात सूज येण्यापासून बचाव करा.
पोटातील सूज कमी करण्याचे घरगुती उपाय
बडीशेप
बडीशेपच्या बियांमध्ये वेदना कमी करण्याची क्षमता असते. सोबतच यात असेही काही तत्व असतात जे अन्न पचवण्यासही फायदेशीर ठरतात. तसेच पोटात सूज आली असेल तर याने दूर केली जाऊ शकते. जेवण केल्यावर नेहमी बडीशेप खाण्याची सवय लावा. याने पोटात सूज येणार नाही. आणखी एक उपाय करायचा तर तुम्ही चहामध्ये बडीशेप मिश्रित करून सेवन करू शकता. तसेच एक पाण्यात बडीशेप उकडून हे पाणी सेवन करावे.
आलं
आल्याच्या मदतीने देखील आतड्यांवर येणारी सूज कमी करता येऊ शकते. सोबतच याने मांसपेशींना आरामही मिळतो. जर तुम्ही नियमित रूपाने आल्याचं सेवन करत असाल तर पोटातील सूज कमी केली जाऊ शकते. यासाठी आल्याचे काही तुकडे एका कपाक टाका आणि वरून गरम पाणी टाका. नंतर कपावर झाकण ठेवा. १० मिनिटांनी त्यात १ चमचा मध आणि तेवढाच लिंबाचा रस टाका. या पाण्याचं सेवन करा.
लिंबू पाणी
लिंबात रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी आणि सी, फॉस्फोरस, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असतात. तसेच यात हायड्रोक्लोरिक अॅसिडही असतं. जे अन्न पचवण्यासाठी शरीराची मदत करतं. त्यासोबतच आपल्या शरीरातून विषारी पदार्थही बाहेर काढतं. एक ग्लास गरम पाण्यात लिबांचा रस टाका आणि हे पाणी सेवन करा.