वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. इतकेच काय तर काही लोक जेवणही सोडतात. पण वजन कमी करण्यासाठी पोटभर जेवण करणं गरजेचं आहे. जर दिवसभर तुम्ही थोड्या थोड्या वेळाने योग्य प्रमाणात काही खात राहिलात तर तुमचं वजन नियंत्रित राहिल. त्यासोबतच काही असे पदार्थ किंवा फळांचं सेवन करा ज्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि कॅलरीजची चिंताही राहणार नाही.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये कॅचिंस नावाचं अॅंटीऑक्सीडेंट आढळतं. जे चरबी वाढवणाऱ्या सेल्सला कंट्रोल करतं. रात्री जेवणानंतर ग्रीन टी घेणे फायद्याचं ठरतं. ग्रीन टी सकाळी रिकाम्या पोटी कधीही घेऊ नये. वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच ग्रीन टीमुळे डोळ्या खालील डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही ग्रीन टी प्यायल्याने वाढते.
लिंबू पाणी, काकडी
शरीरातील नुकसानकारक टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यामुळे रोज जास्तीत जास्त पाणी प्यावे. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबूचा रस मिश्रित करुन प्यावे. यात तुम्ही मिंटही टाकू शकता. याने पचनक्रिया चांगली होती. त्यासोबतच काकडीमधी अॅंटी-इन्फ्लेमेट्री तत्वही डायजेशन चांगलं होण्यासाठी फायदेशीर आहे. यासोबतच वेगवेगळ्या फळाचे सेवन करा.
बदाम आणि करवंद
बदामामध्ये व्हिटॅमिन इ अॅंटीऑक्सीडेंट्स, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशिअम, कॅल्शिअमसारखे भूक कंट्रोल करणारे तत्व असतात. यांचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखं राहतं. तेच दुसरीकडे करवंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर अधिक प्रमाणात असतात. याचाही फायदा वजन कमी करण्यास होते.
दही
दही खाल्ल्यानं शरीरातील अधिक चरबी कमी होते. ताक दिवसातून दोन-तीन वेळा प्यायल्यास फायद्याचं ठरतं. दह्यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टीरिया असतात. ते जेवण पचविण्यासाठी मदत करतात. दररोज जेवण करताना दही खाणे चांगले. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
(टिप- या पदार्थांचे किंवा फळांचे सेवन करण्यापूर्वी एक्सपर्टचा सल्ला अवश्य घ्या. कारण काहींना याची अॅलर्जीही असू शकते किंवा काहींना हे सूटही होणार नाहीत)