शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

दातांच्या पिवळटपणामुळे इंप्रेशन खराब होतंय? घरच्याघरी 'या' उपायांनी मिळवा चमकदार दात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:11 AM

तुमचे दात किडले असतील तर तुम्हाला त्यांचा रंगही बदलेला जाणवेल. त्यामुळे दात किडणं हे देखील तुमच्या दातांच्या रंगावर परिणाम करत असते.  

दिवसभरात अनेक पदार्थ खाण्यात येत असतात. त्यामुळे दातांची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. काहीही खाल्यानंतर ब्रश केला नाही तर दातांवर थर जमायला सुरूवात होते. त्यामुळे दात पिवळे होतात. हसताना किंवा बोलताना दात जर समोरच्या व्यक्तीला पिवळे दिसत असतील तर खूप खराब दिसून येतं. त्यामुळे तुमचं इंप्रेशन सुद्धा कमी होत असतं. घरच्याघरी उपलब्ध असलेल्या सामानापासून तुम्ही स्वतःचे दात चमकवू शकता.

दात स्वच्छ केले नाहीत तर दातांना किड लागते. किडलेले दात कधीच शुभ्र दिसत नाही. ते दात कालांतराने कमकुमवत होतात. तुमचे दात किडले असतील तर तुम्हाला त्यांचा रंगही बदलेला जाणवेल. त्यामुळे दात किडणे हे देखील तुमच्या दातांच्या रंगावर परिणाम करत असते.  

बेकिंग सोडा

जेवणात तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर कधीतरी करत असाल तर याचा वापर तुम्ही दातांसाठी करू शकता. त्यासाठी एक लहानसा चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात हायड्रोजन पॅरॉक्साईड दोन चमचे मिसळा. हे मिश्रण एकत्र करून आपल्या दातांना घासा. सतत दोन ते तीन आठवडे हा प्रयोग केल्यास दातांचा पिवळटपणा निघून जाऊन दात चमकदार दिसतील.

नारळाचं तेल 

नारळाचं तेल आपल्या घरात असतंच. नारळाच्या तेलाचा वापर दातांमध्ये जमा झालेली घाण काढून टाकण्यासाठी सुद्धा केला जातो.  त्यासाठी दोन चमचे नारळाचं तेल तोंडात काहीवेळ ठेवा. नंतर तोंड स्वच्छ करा. हा प्रयोग केल्यास दातांमध्ये जमा झालेली घाण आणि पिवळटपणा निघून जाईल.

कडुलिंब

दातांचा पिवळपणा कमी करण्यासाठी कडुनिंब हे उत्तम आहे. कडुनिंबामुळे तुमच्या दातांमधील किड, दातांचा पिवळेपणा आणि दातांच्या इतर समस्या कमी होण्यास मदत मिळते. कडुनिंबाची पावडर घेऊन तुमचे दात ब्रश करु शकता. तुमच्या दातांचा रंग उजळण्यासोबतच तुमच्या दातांच्या इतर समस्याही त्यामुळे दूर होतील. कडुनिंबाचा वापर करण्याचे कोणतेही साईडइफेक्ट्स नाहीत. (हे पण वाचा-CoronaVirus :स्वयंपाकघरातील 'या' चुकांमुळे होऊ शकता कोरोनाचे शिकार, 'असा' करा बचाव)

कोळसा

कोळसा तुमच्यातील दातांवरील काळेपणा दूर करण्यास फायदेशीर ठरतो. कोणतीही इम्प्युरीटी कोळसा काढून टाकण्यास मदत करते. जर तुम्ही कोळशाचा वापर करत असाल तर त्याचे नुकसानही तुम्हाला होणार नाही. त्यामुळे बाजारात सहज उपलब्ध होणारी एक्टिव्ह चारकोल पावडर घेऊन तुम्ही ती तुमच्या दाताला चोळू शकता. त्यामुळे तुमचे दात स्वच्छ आणि पांढरे होतील. याशिवाय तुम्हाला तर दात नेहमी चांगले रहावेत असं वाटत असेल तर चहा, कॉफीचं सेवन कमी करा. तसंच काहीही खाल्यानंतर दात लगेच स्वच्छ करा. ( हे पण वाचा-CoronaVirus : कोरोनाचे इन्फेक्शन झाल्यानंतर सुरूवातीचे ९ दिवस कसे असतात, जाणून घ्या)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य