स्पर्धेच्या या युगात स्वत:ला सक्रिय आणि इतरांपेक्षा चांगलं दाखवणं हा लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. कामं जास्त आणि वेळ कमी असल्यामुळं आपण आपला आहार सकस ठेवणं विसरलो आहोत. दुसऱ्या बाजूला फास्ट फूड, महागडी सौंदर्य उत्पादनं याकडे वळलो आहोत. परंतु, सौंदर्य उत्पादनं (Beauty Products) आपल्याला वरवरचं सौंदर्य देऊ शकतात. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे आणि नियमित व्यायामाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी जाणून घ्या काही सोप्या टिप्स. या वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची चमक कायम ठेवू शकता आणि इतरांची तुलनेत स्वतःला अधिक सक्रिय (Beauty Tips) ठेवू शकता.
नियमितपणे पाणी प्याहिवाळा असो, उन्हाळा असो वा पावसाळा, प्रत्येक ऋतूत तुम्ही दररोज किमान साडेतीन ते चार लिटर पाणी प्यावं. यामुळं पचनशक्ती मजबूत होते. चेहऱ्यावर चमक कायम राहते. तसंच तुमच्या शरीरात ऑक्सिजन योग्य पातळीवर राहतो.
आहारात अंकुरलेल्या धान्यांचा समावेश कराअंकुरलेली किंवा मोड आलेली धान्यं केवळ सौंदर्य आणि चमकच देत नाहीत, तर शारीरिक ताकदही देतात. यामध्ये आढळणारं फायबर आणि प्रथिनं तुमच्या चेहऱ्यावर चमक आणतील. तसंच तुमची पचनसंस्था निरोगी ठेवतील.
व्हेज सॅलडव्हेज सॅलड केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर तुम्हाला निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. तुम्ही ते तुमच्यासोबत एका डब्यात घेऊन जाऊ शकता आणि जेवणाव्यतिरिक्त तुम्ही दररोज दिवसातून दोन ते तीन वेळा सॅलड खाऊ शकता. यामुळं तुम्हाला तुमच्यातील बदल जाणवेल.
फास्ट फूड, जंक फूडला No म्हणावेळेअभावी तुम्ही तुमच्या साध्या जेवणाऐवजी फास्ट फूडवर जास्त अवलंबून झाला आहात. पण फक्त चवीसाठी म्हणून खाल्लं जाणारं फास्ट फूड काही प्रमाणात ठीक आहे. ते याहून अधिक खाल्ल्यास शरीराला खूप हानी पोहोचवते. फास्ट फूड खाण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आठवडा-पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस तेही कमी प्रमाणात फास्ट फूड खाण्याचा प्रयत्न करा.
जास्त चहा आणि कॉफी पिऊ नकातुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल तर, तुम्हाला ताण कमी करण्यासाठी चहा-कॉफी पिण्याची सवय लागलेली असू शकते. मात्र, ही सवय सोडण्याचा प्रयत्न करा. या सवयीमुळे तुम्ही अकाली वयस्कर दिसू लागता. त्याऐवजी हर्बल टी, ग्रीन टी किंवा लेमन टी हा चांगला पर्याय असू शकतो.