अलिकडे कमी वयातच अनेकांचा केस पांढरे होतात. अशात लोक वेगवेगळे उपाय करतात. केमिकल असलेले अनेक उत्पादने वापरतात. पण केस काळे करण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे मेहंदी आहे. मेहंदी एक औषधी आहे, ज्याने डॅड्रफ आणि केसगळतीची समस्याही दूर होते. सोबतच डोक्याची उष्णताही दूर होते. उन्हाळ्यात तर हा उपाय जास्त बेस्ट ठरतो.
केस काळे करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करून थकले असाल तर मेहंदी वापरायला हवी. मेहंदीने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मेहंदीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्याने इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
अनेकजण मेहंदी लावतात पण अनेकांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत नसते. मेहंदी लावताना त्याच्या अधिक फायद्यासाठी त्यात प्रोटीन किंवा व्हिटॅमिन ई युक्त गोष्टींचा समावेश करून लावावी. केवळ मेहंदी लावल्याने केस रखरखीत होण्याची शक्यता असते.
मेहंदी लावण्याची योग्य पद्धत
1) दोन चमचे मेहंदी पावडरमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि एक चमचा अंड्याचा पांढरा भाग मिश्रित करा. हे मिश्रण केसांना लावा आणि जेव्हा हे सुकेल तेव्हा केस कोमट पाण्याने स्वच्छ करा. याने केस रखरखी होणार नाहीत आणि केसांना पोषण मिळेल.
2) तुम्हाला हवं असेल तर मेहंदी पावडरमध्ये लिंबाचा रस आणि दही मिश्रित करूनही तुम्ही लावू शकता. एकीकडे मेहंदी केसांना रंग देण्याचं काम करेल तर दह्यामुळे केस मुलायम होतील.
3) मेहंदी पावडरमध्ये चहा पावडर मिश्रित करून रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी मेहंदीचा रंग अधिक गर्द होईल. केसांना मेहंदी लावण्यापूर्वी तेल नक्की लावा.
4) बीटाच्या रसात भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि पाणी असतं. जे केसांना हायड्रेट ठेवतात आणि केस याने कोरडे किंवा सुष्क होत नाहीत. बीट उकडून मेहंदीमध्ये टाकल्यास केसांना नैसर्गिक रंग मिळतो, ज्याने केसांचं सौंदर्य अधिक वाढतं.
5) मेथी पावडर मेहंदीमध्ये टाकून भिजवा. ही मेहंदी केसांना लावा. मेथीच्या पावडरमध्ये भरपूर प्रोटीन असतं. जे डोक्याच्या त्वचेला इन्फेक्शन होण्यापासून रोखतं. तसेच याने केस मजबूत आणि मुलायम होता.