बदलत्या जीवनशैलीमुळे जंक फूड मोठ्यांसोबतच लहानांच्या जीवनाचाही अविभाज्य भाग झाला आहे. या सवयीमुळे अनेक मुलं हेल्दी फूडऐवजी जंक फूड खाणंच पसंत करतात. जंक फूड खाल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य पद्धतीने होत नाही. जंक फूडचे जास्त सेवन केल्यामुळे अनेक मुलं सध्या लठ्ठपणासारख्या आजारांचा सामना करत असीन जंक फूडमुळे अनेक घातक आजार होण्याचाही धोका असतो.
अनेक पालकांची इच्छा असते की, मुलांना जंक फूडपासून दूर ठेवावं, पण मुलांच्य हट्टासमोर तेही हतबल होतात. पण सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर आपल्या फेसबुक लाइव्ह मधून मुलांना जंक फूडपासून दूर ठेवण्यासाठी काही टिप्स सांगत आहेत. जाणून घेऊया त्यांनी सांगितलेल्या काही टिप्स...
पहिली स्टेप : जंक फूड म्हणजे काय ते ओळखा
जंक फूड जे सर्वात जास्त नुकसान पोहोचवणारं असतं, ते आपण अगदी सहज ओळखतो. फास्ट फूड चेन पिझ्झा आणि बर्गर, पॅकेज्ड चिप्स, कोल्डड्रिंक्स, चॉकलेट्स, आइसक्रिम्स, पेस्ट्री, नुडल्स, टॉमेटो केचअप इत्यादी पदार्थांचा जंक फूडमध्ये समावेश होतो.
असं पदार्थ ज्यांचा जंक फूडमध्ये समावेश होतो आणि ते हेल्दी असण्याचा जावा केला जातो. त्यांच्यामध्ये फरक करणं थोडं कठिण असतं. उदाहर्णार्थ, असे ज्यूस जे टेट्रापॅक आणि पावडर स्वरूपात असतात, बिस्किट्स अगदी तेही जे फायबरयुक्त असण्याचा दावा करतात त्यांचाही समावेश जंक फूडमध्ये होतो. डार्क चॉकलेट, चॉकलेट सिरप, केक आणि मफिन्स, रेडी टू कूक, एनर्जी ड्रिंक, बेक्ड किंवा मल्टीग्रेन चिप्स, जॅम, न्यूडल्स, फ्लेवर्ड दही आणि दूध यांचाही समावेश जंर फूडमध्ये होतो.
दुसरी स्टेप - जंक फूड खाणं कसं कमी करावं?
जंक फूड खाणं कमी करण्यासाठी एक विशिष्ट योजना तयार करावी लागते. प्रत्येक महिन्याच्या हिशोबाने ही योजना तयार करावी. जर तुम्ही महिन्यामध्ये 8 वेळा जंक फूड खात असाल तर पुढिल महिन्यात 4 वेळाच खा. म्हणजे प्रत्येक महिन्यात 50 टक्क्यांनी कमी करा. तिसऱ्या महिन्यामध्ये 2 वेळाच खा आणि चौथ्या महिन्यामध्ये एकदाच खा आणि 5व्या महिन्यामध्ये जंक फूड खाणं सोडा.
मुलांची जंक फूडची सवय सोडवण्यासाठी पालकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा सुट्टीच्या दिवशी किंवा विकेंडला पालकच मुलांना पार्टीसाठी बाहेर घेऊन जातात आणि हे पदार्थ खाऊ घालतात. पालकांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या तर मुलांना सहज जंक फूडपासून दूर ठेवणं शक्य होतं.