(Image Credit : Verywell Mind)
लहानपणी आपल्या अगदी सगळ्या गोष्टी लक्षात राहायच्या. पण सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात ठेवणं अवघड झालं आहे. बऱ्याचदा अगदी बारिक-सारिक गोष्टी लक्षात ठेवणं अशक्य होतं. अनेकदा तर एखादी गोष्ट प्रयत्न करूनही लक्षात ठेवणं अशक्य होतं. ही स्मरणशक्ती कमकुवत होण्याची लक्षणं आहेत. अनेकदा असं म्हटलं जातं की, वाढत्या वयाचा परिणाम आपल्या मेंदूवरही होतो. परंतु, काही उपाय केल्यानंतर तुम्ही ही समस्याही दूर करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये काही खास बदल करावे लागतील. कारण आम्ही जे सांगणार आहोत, ते अगदी सोपे उपाय आहेत. जे स्मरणशक्ती वाढविण्यासोबतच मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया 8 खास उपायांबाबत...
एक्सरसाइज
एक्सरसाइज अर्थात व्यायाम केल्यामुळे शरीराचं सुदृढ राहण्यास मदत होते. जेव्हा एखादी व्यक्ती एक्सरसाइज करत असते त्यावेळी मुबलक प्रमाणात ऑक्सिजन घेते आणि शरीरामध्ये ऊर्जेसोबतच नवीन पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. एक्सरसाइजमुळे शरीरातील पेशी एकमेकांच्या संपर्कात असतात आणि मेंदूचं कार्य सुरळीत राहतं.
संतुलित आहार
आपल्या आहाराचाही आपल्या मेंदूवर परिणाम होत असतो. एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, डाएटमधून मिळणारी एनर्जी आणि शुगरचा 20 टक्के भाग मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. शरीरामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम तर याचा थेट मेंदूवर होतो. मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी ड्रायफ्रुट्स, मासे आणि फळं फायदेशीर ठरतात.
तणाव ठेवा दूर
सतत तणावात राहणं आरोग्यासाठी उत्तम नसतं. दरम्यान काही एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, तणावामध्ये मेंदू व्यवस्थित काम करतो. पण जर तणावाचा काळ वाढला तर डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते. कधी-कधी आपल्या मेंदूला आराम देण्यासाठी तुम्हाला एकांतामध्ये काही नव्या ठिकाणांना भेट देणंही फायदेशीर ठरतं. यामुळे मेंदूवर येणारा ताण कमी करण्यास मदत होते.
काही नव्या गोष्टी करण्यासाठी
मेंदूचा व्यायामही होणं आवश्यक असतं. जर तुम्हाला मेंदूचं आरोग्य राखायचं असेल तर काही नवीन गोष्टी करणं गरजेचं असतं. जसं काही नव्या गोष्टी शिकणं, वाचणं, लिहणं. खेळही मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रयत्न करा की, दररोज एखादा खेळ तरी खेळता येईल.
मनोरंजन आणि संगीत
तणावामध्ये असाल तर संगीत किंवा एखादा मनोरंजनात्मक कार्यक्रम तुम्हाला फार मदत करेल. तुम्ही कधी अनुभव घेतला असेल की, जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट पाहता किंवा गाणं ऐकता, तेव्हा आपल्या शरीराच प्रत्येक अवयव अॅक्टिव्ह राहतो. ही क्रिया मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी उत्तम मानली जाते.
शांत झोप आणि रिसर्च
जर तुम्ही शांत झोप घेतली तर तुमचा मेंदूही व्यवस्थित काम करण्यासाठी मदत करतो. जर तुमची झोप योग्य नसेल तर त्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीवर याचा वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला झोप येत नसेल तर एखादं छानसं पुस्तक वाचा किंवा रिसर्च करा. यामुळे मेंदू अॅक्टिव्ह राहण्यासाठी मदत होते.
लक्षात ठेवा
आपण अनेकदा पाहतो की, रात्री उशीरा झोपल्यामुळे किंवा सकाळी उशीरा उठणं या दोन्ही गोष्टी शरीर आणि मेंदूसाठी योग्य नाहीत. प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 6 तासांची झोप घेणं आणि सकाळ लवकर उठण्याची सवय करून घेणं आवश्यक आहे. तसेच प्रयत्न करा की, रात्री झोपताना तुमच्या खोलीमध्ये अंधार असेल आणि जेव्हा सकाळी उठाल तेव्हा सूर्याचा प्रकाश. या दोन्ही गोष्टी मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं)