शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

जंक फूडच्या विळख्यातून कसं सुटाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 3:40 PM

सोप्पं आहे.. करून तर पाहा!..

ठळक मुद्देखूप भूक लागेल इतक्या वेळ उपाशी राहू नये आणि क्वॉलिटी फूडवर कटाक्ष द्यावा.चालायला जाणं, व्यायाम, योगा.. अशा गोष्टी केल्यास ताण कमी होतो आणि जंकफूडपासूनही आपण लांब राहतो.झोप कमी झालेली असली, तर जंक फूडकडे तुमचा ओढा वाढू शकतो.स्पोर्ट्स ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, शुगर ड्रिंक्स, सोडा.. यासारख्या पादार्थांना लांबूनच रामराम करायला हवा.

- मयूर पठाडेचटकमटक काही समोर दिसलं की आपल्याला लगेच ते तोंडात का टाकावंसं वाटतं? घरी केलेल्या स्वयंपाकापेक्षा याच आणि अशाच गोष्टींची चटक आपल्याला का लागते? जंक फूडच्या आपण एवढं प्रेमात का पडतो? जंक फूडचा पिच्छा सोडवायचा असेल तर त्यासाठी काय करता येईल?..मुळात जंकफूडच्या प्रेमात आपण पडतो, कारण त्याच्या रंगरुपापासून तर त्यांच्या टेस्टपर्यंत सारंच काही टेम्प्टिंग असतं. त्यामुळे आपसूकच आपण त्यांच्या प्रेमात पडतो. शिवाय आपल्या आजूबाजेचे सारेच जण येता जाता तेच खात असतात, त्याच आणि तशाच गोष्टी आपल्या पुढ्यात येत असतात. बºयाचदा त्या गोष्टींशिवाय पर्यायही नसतो आणि झटपट ते आपल्या हातात मिळत असल्यामुले वेळ वाचवण्यासाठीही आपण जंक फूडकडे आकर्षित होतो.

जंक फूडपासून स्वत:ला कसं वाचवाल?१- मुळात वेळच्या वेळी आपल्या पोटात गेलेलं नसलं, तर वेळी अवेळी आपल्याला भूक लागते आणि मग समोर जे दिसेल त्यावर आपण तुटून पडतो. त्यामुळे खूप भूक लागेल इतक्या वेळ एकतर उपाशी राहू नये आणि जेव्हा केव्हा आपण खाऊ त्या प्रत्येक वेळी ते क्वॉलिटी फूड असेल याकडे आपला कटाक्ष असायला हवा.२- ‘क्रॅश डाएट्’चं सध्या फार फॅड आहे. लवकरात लवकर आणि पटकन आपल्या पुढ्यात जे खाद्यपदार्थ येतात, जे चटकदारही असतात, ते खाण्याकडे साहजिकच आपला कल असतो. अशा भुलभुलैयापासून आपण जाणीवपूर्वक दूर राहायला हवं.३- साखरचं प्रमाण जास्त असलेल्या पेयांपासून कटाक्षानं दूर राहायला हवं. कारण त्यातून आपण कॅलरीज पित असतो. तुम्ही व्यायामपटू असाल, तुमचं खूप एक्सरशन होत असेल, तर ठीक, अन्यथा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, शुगर ड्रिंक्स, सोडा.. यासारख्या पादार्थांना लांबूनच रामराम करायला हवा.४- खूप वेळ ताण सहन करावा लागणार नाही अशी परिस्थिती आपण स्वत:च निर्माण करायला हवी. कामाचा ताण आपल्याला जाणवतोय, असं वाटायला लागल्याबरोबर त्यापासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या जवळच्या मित्रांशी बोलणं, गप्पा मारणं, चालायला जाणं, व्यायाम, योगा.. अशा गोष्टी केल्यास ताण कमी होतो आणि जंकफूडपासूनही आपण लांब राहतो.५- काहीही झालं तरी आपली झोप व्यवस्थितच व्हायला हवी. झोप कमी झालेली असली, की त्याचे शरीरावर तर विपरित परिणाम होतातच, पण याच कारणामुळे जंक फूडकडे तुमचा ओढा वाढू शकतो.