ठळक मुद्देपावसाळ्यांत जड आहार बंद करावैयक्तिक स्वच्छता पाळापाणी उकळून प्याकोल्ड्रिंक्सपासून दूर राहा
- मयूर पठाडेपावसाळ्यात कसलं एकदम भारी वांटतं ना? सगळीकडे हिरवंगार रान पसरलेलं असतं, हा हिरवा निसर्ग तुम्हाला मोहिनी घालतोच आणि तुम्हीही निघता फिरायला या निसर्गाच्या कुशीत..आपल्या साºया चित्तवृत्ती निसर्गाच्या या सान्निध्यात फुलून येतात. निसर्गाशी आपण तादात्म्य पावतो आणि त्याची संगत कधीच सोडू नये असंही वाटतं..या साºया गोष्टी खºया आहेतच, पण खरंतर पावसाळ्यांत बºयाचदा यापेक्षा वेगळं चित्र आपल्याला दिसतं. सारखा पाऊस पडत असतो. सगळीकडे चिकचिक झालेली असते. डास, माशा, किडे यांचा फैलाव झालेला असतो. सारं वातावरण रोगट झालेलं असतं.. हे रोगट वातावरण तुम्हालाही त्याच्या कुशीत ओढतंच. त्यामुळेच या काळात बºयाचदा आपल्याला डल वाटतं. सारा प्रसन्नपणा आणि उत्साह गळून गेलेला असतो. काहीच करावंसं वाटत नाही. ओढूनताणून हा उत्साह आपल्याला टिकवावा लागतो.पण असं जर होऊ द्यायचं नसेल तर काय करायचं?पावसाळ्याच्या दिवसात कसा टिकवून ठेवायचा आपला उत्साह?काही नाही, सोप्पं आहे. खाली दिलेल्या या गोष्टी करा, म्हणजे बघा, या पचपचलेल्या वातावरणातही तुम्ही फ्रेश राहता की नाही ते:
कसा टिकवायचा उत्साह?
१- सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात कधीच जड आहार घेऊ नका. कितीही आवडला तरी. या काळात आपला आहार लाइटच हवा. भुकेपेक्षा चार घास जरा कमीच खा.२- काहीतरी काम करीत राहा. उत्साहवर्धक गोष्टी करीत राहा. पावसाळ्यात बºयाचदा लिथार्जी येते. काहीच करावंसं वाटत नाही. आपल्या आवडीचं काम करीत राहिलं तर ही लिथार्जी तुमच्यापासून दूर पळेल.३- पावसाळ्यात सर्वाधिक लक्ष द्यावं लागतं ते पर्सनल हायजिनकडे. या काळात जरा जास्तच स्वच्छता पाळावी लागते. ही स्वच्छता पाळली तर अनेक आजार तर तुमच्यापासून दूर राहतीलच, पण ढगाळ वातावरणातली नकारात्मकता तुम्हाला घेरणार नाही.४- या काळात पाणी शक्यतो उकळूनच प्या. पाणी उकळून प्याल्याने या वातावरणात होणारे जवळपास ९५ टक्के आजार तुमच्यापासून दूर पळतील आणि तुमची पचनशक्तीही टिकून राहली.५- बाजारात मिळणाºया कोल्ड्रिंकच्या बाटल्या आजकाल सारेच जण येताजात ओठाला लावताना दिसतात. मुळातच ते घातक, पण पावसाळी वातावरणात तर ते जास्तच घातक. कारण मुळात कोल्ड्रिंकमुळे तुमच्या शरीरातील मिनरल्स, खनिज द्रव्याचं प्रमाण कमी होतं, कारण हे कोल्ड्रिंक्स तुमच्या शरीरातील मिनरल्स शोषून घेतात.