डाळ, भात, भाजी आणि भातावर सोडलेली तुपाची धार म्हणजे उत्तम कॉम्बिनेशन. अनेकजण अशा जेवणाचे चाहते आहेत. गोडाचा खमंग वास ते व्यंजन तुपात भाजल्याशिवाय दरवळतच नाही. अस्सल तुपात बनवलेले लाडू पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. पण तुम्ही वापरात असलेलं तुप शुद्ध की अशुद्ध हे कसे तपासाल? यासाठी आम्ही तुम्हाला साध्या सोप्या टीप्स देणार आहोत पण त्या आधी जाणून घ्या तूप खाण्याचे फायदे
- त्वचा तजेलदार ठेवत. त्वचा तजेलदार राहण्यासाठी तुप अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे त्वचेवरचा रुक्षपणा जाऊन त्वचा मऊ व तजेलदार होते.
- तुपामध्ये मॅटाबॉलीजम नियंत्रणात ठेवणारे घटक आहेत त्यामुळो वजन नियंत्रित राहतं तसेच रक्तातील शर्कराही नियंत्रणात राहते.
- तुपामुळे रक्तात साठलेलं कॅल्शिअम कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचं ब्लड र्सक्युलेशम उत्तम होतं. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते.
- तूप पीसीओडी, मधूमेह, ब्लड प्रेशर यावरही फायदेशीर ठरतं. कारण तुपात व्हिटॅमीन ए, डी, फॉस्फरस, पोटॅशियम असते.
- गॅसचा त्रास असेल तर तूप खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे तूपाचा आहारात समावेश कराच.
कसे ओळखावे तुप शुद्ध की अशुद्ध?४ ते ५ चमचे तूप एका भांड्यात व्यवस्थित उकळून घ्या. त्यानंतर एक दिवस थंड करत ठेवा. त्यानंतरही तुपाचा वास आणि दर्जा दोन्ही उत्तम असेल तर तूप वापरण्या योग्य आहे. असे नसल्यास ते तूप कोणत्याही औषधासाठी व जेवणातही वापरू नका.