(Image Credit : Medical News Today)
प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. या ग्रंथीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास वेळोवेळी लघवीला जाण्याची इच्छा होते. वेळीच उपचार न केल्यास प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वाढते. वाढत्या वयासोबत हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढत जातो.
सामान्यपणे प्रोस्टेट ग्रंथींच वजन १८ ग्रॅम असतं, पण याचं वजन ३० ते ५० ग्रॅम झाल्यावर प्रोस्टेट कॅन्सर होतो. ४० वयानंतर ग्लॅडचा आकार वाढू लागतो. जर सुरूवातीलाच या आजाराची लक्षणे ओळखली गेली तर यापासून बचाव करता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लक्षणे
१) लघवी करताना त्रास होत असेल तर हा प्रोस्टेट कॅन्सरचा इशारा आहे. रात्री अनेकदा लघवीला जावे लागणे, अचानक लघवीचा फ्लो कमी होणे, लघवी केल्यानंतरही लघवी आल्यासारखे वाटणे ही प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे आहेत. त्यासोबतच लघवी आणि मल यातून रक्तही येऊ शकतं. असं प्रोस्टेट ग्रंथी वाढल्या कारणाने होतं.
२) जर शरीराच्या एखाद्या भागात कोणत्या प्रकारचं परिवर्तन दिसलं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्वचेमध्ये अशाप्रकारचा बदल प्रोस्टेट कॅन्सरचं सुरूवातीचं लक्षण असू शकतं. तेच शरीराचा एखादा भाग काळपट किंवा सावळा पडू लागला असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
३) काहीही काम करता शरीराच्या एखाद्या भागात वेदना होणे हे प्रोस्टेट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तर पाठ सतत दुखत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
४) सतत वजन कमी होणे हे प्रोस्टेट कॅन्सरचं लक्षण आहे. काहीही न करता जर शरीराचं वजन कमी होत असेल ही धोक्याची घंटा असू शकते. तसेच पचनक्रिया योग्यप्रकारे होत नसेल तर हे सुद्धा प्रोस्टेट कॅन्सरचं लक्षण मानलं जातं. तसेच या कॅन्सरमुळे व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते.
वाढत आहेत केसेस
पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या केसेस वाढत आहेत. एका रिपोर्टनुसार, प्रोस्टेट कॅन्सर भारतासहीत आशियातील पुरूषांमध्ये वेगाने वाढत आहे. अशात या कॅन्सरबाबतची माहिती लोकांनी घेणे गरजेचे आहे.
सुरूवातीला उपाय शक्य
प्रोस्टेट कॅन्सरबाबत जर सुरूवातीलाच माहिती मिळाली तर यावर उपाय शक्य आहे, असे बोलले जाते. पण जर वेळ निघून गेली असेल तर यूरिन पॅसेजमध्ये कॅथेटरच्या माध्यमातून ट्यूब टाकून दोन ते चार दिवस सोडली जाते. हळूहळू स्थिती नॉर्मल होते. पण यानेही आराम मिळाला नाही तर सर्जरी करण्याची गरज पडते. प्रोस्टेट कॅन्सर कोणतेही नुकसान न करता शरीरात निष्क्रिय रूपाने पडून राहू शकतो. हा आजार अधिक वाढल्यानंतर ग्रस्त रुग्णांचा मूत्रप्रवाह बाधित किंवा कमजोर होतो.