How long can you use a towel without washing it: स्वच्छता सगळ्यांनाच आवडते. पण काही लोक असे असतात ज्यांना स्वच्छता काय ते काही माहीत नसतं. केवळ आंघोळ करणं हेच त्यांना माहीत असतं. पण तरीही काही लोक फार चांगल्या प्रकारे स्वच्छता करतात. तर काही लोक टॉवेल अनेक आठवडे न धुता वापरतात.
अशात असा प्रश्न अनेकांना पडतो की, ज्या टॉवेलने तुम्ही शरीर पुसता तो स्वच्छ आहे की नाही. किंवा तो किती दिवसांनी धुवायला हवा. चला जाणून घेऊ टॉवेल किती दिवस वापरल्यानंतर धुवायला हवा.
टॉवेलमध्ये असतात बॅक्टेरिया
टॉवेलने शरीर पुसल्यानंतर त्याच्या धाग्यांमध्ये बॅक्टेरिया चिकटून राहतात. ज्यानंतर त्यात असलेल्या ओल्यामुळे बॅक्टेरियांना वाढण्यासाठी अनुकूल असं वातावरण मिळतं. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा बॅक्टेरिया फंगल आणि व्हायरस आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचतात. आंघोळ केल्यावरही काही बॅक्टेरिया आपल्या त्वचेवर राहून जातात. जे नंतर टॉवेलला लागतात.
अशात जेव्हा आपण त्या टॉवेलचा पुन्हा वापर करतो तेव्हा ते पुन्हा आपल्या शरीरावर येतात. टॉवेल पुन्हा पुन्हा न धुता किंवा वाळवता वापरत असाल तर यावरील बॅक्टेरिया आपली त्वचा आणि नाकाच्या वाटे शरीरात पोहोचतात याने आपण आजारी पडतो.
टॉवेल न धुता पुन्हा पुन्हा वापरला तर त्वचा रोग होण्याचा धोका अधिक असतो. हेच नाही तर या टॉवेलमुळे तुम्हाला एक्जिमा, खाज किंवा रॅशेजसारख्या त्वचेसंबंधी गंभीर समस्याही होतात.
किती वापरल्यावर धुवावा टॉवेल?
डॉक्टरांनुसार, त्वचारोगापासून वाचण्यासाठी तुम्ही टॉवेल नियमित धुतला पाहिजे. जास्तीत जास्त तीन वेळा वापरल्यावर तुम्ही टॉवेल धुवायला हवा. म्हणजे रोज आंघोळ करणाऱ्यांनी दर तिसऱ्या दिवशी टॉवेल धुवायला हवा. सोबतच त्याचा वापर झाल्यावर तो उन्हात वाळत घालावा. एकूणच काय तर टॉवेल आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा धुतला पाहिजे.