- मयूर पठाडेमोबाइलच्या स्क्रीनला आपण किती चिकटलेले असतो? मोबाइल जर हातातून थोडा वेळ जरी बाजूला राहिला तर आपल्याला किती अस्वस्थ होतं? उठता-बसता किती वेळा आपण मोबाइल चेक करतो? सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत किती वेळा आणि किती वेळ आपण त्यात तोंड घालून असतो? मित्र-मैत्रिणींसोबत रात्री किती वाजेपर्यंत आपण टेक्स्टिंग करत असतो? किती वेळ त्यावर व्हीडीओ पाहतो?..
विचारा स्वत:लाच. आणि आता काही वेळ तुमच्या हातातला मोबाइल जरा बाजूलाही काढून ठेवा. पाहूच नका त्याच्याकडे. तुमच्या लक्षात येईल मोबाइलच्या या स्क्रीनशिवाय आपण राहूच शकत नाही. थोडा वेळ जरी या स्क्रीनपासून आपण बाजूला गेलो तर आपल्याला अस्वस्थ वाटल्यासारखं होतंय.तरुणांमध्ये तर या स्क्रीनचं आॅब्सेशन आहेच, पण आता हे वयही कमी कमी होत जाऊन शाळकरी मुलांच्याही हातात मोबाइल आला आहे. तेही या स्क्रीनच्या वेडाला तितकेच सरावले आणि बळी पडले आहेत.पण ही धोक्याची घंटा आहे.
या संदर्भात जगातील सर्वात मोठं संशोधन नुकतंच करण्यात आलं.आॅस्ट्रेलियाच्या मर्डोक आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केलं. तब्बल चार वर्षं हे संशोधन सुरू होतं.वेगवेगळ्या शाळांतले आठवतीले तब्बल ११०० मुलं त्यांनी निवडली आणि ते अकरावीला जाईपर्यंत त्यांचा आणि त्यांच्यावर मोबाइलच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. विशेषत: मुलांच्या मेंदूवर आणि त्यांच्या झोपेवर या स्क्रीनचा काय परिणाम होतो, याविषयीचा हा अभ्यास होता.त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारा आहे. आठवीत असणारी ही मुलं तेव्हा रात्री सारे जण झोपल्यावर आणि लाईट बंद केल्यावरही मोबाइलच्या स्क्रीनवर असायची. त्याचं प्रमाण होतं जवळपास ६५ टक्के. चार वर्षानंतर संशोधकांच्या लक्षात आलं, रात्री लाइट बंद झाल्यावरही स्क्रीनवर डोळे खिळवून बसण्याचं हे प्रमाण जवळपास ७८ टक्क्यांपेक्षाही अधिक झालं आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या केवळ शारीरिक क्षमतेवरच नाही, तर त्यांच्या मानसिक क्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम झाला आहे. या अनैसर्गिक प्रकाशाचा धोका सर्वात मोठा आहे हेदेखील त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे रात्री लाइट बंद केल्यानंतर तर चुकूनही मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोळे खुपसून बसू नका, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. काय आढळून आलं संशोधकांना?मोबाइल स्क्रीनचे धोके