Benefits Of Lutein: ल्यूटिन एक असं तत्व आहे जे खासकरून प्लांटमध्ये आढळतं. तसेच काही फूड्समध्ये असतं. हे एकप्रकारचं फायटोकेमिकल (Phytochemical) असतं. ज्याचे अनेक फायदे होतात. ल्यूटिन खासकरून मिरच, ओवा आणि गाजर यात आढळून येतं. चला जाणून घेऊ याने कोणत्या समस्या दूर होतात.
ल्यूटिन बेस्ड फूड्सचे फायदे
1) नॅच्युरल अॅंटी-ऑक्सीडेंट (Natural Antioxidants)
ल्यूटिन एक पॉवरफुल अॅंटी-ऑक्सिडेंट आहे ज्याने शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्या दूर होतात. हे फ्री पोषक तत्वांविरोधात लढतात आणि सेल्सना नुकसान होण्यापासून वाचवतात.
2) तणाव होईल कमी
ल्यूटिनचा वापर सामान्यपणे तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी केला जातो. याने तुमचा मूड चांगला होतो.
3) अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण
ल्यूटिनमध्यें अॅंटी-इफ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे सूज कमी करण्यास मदत मिळते. याने तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. तसेच अनेक आजारांपासूनही बचाव होतो.
4) हृदयाचं आरोग्य
ल्यूटिनच्या माध्यमातून हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. याने हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर, ट्रिपल वेसल डिजीज आणि कोरोनरी आर्टरी डिजीजपासून बचाव होतो.
5) अॅंटी कॅन्सर तत्व
प्लांट बेस्ड फूड्समध्ये आढळणारे ल्यूटिनमध्ये अॅंटी-कॅन्सर गुण असतात. हे कॅन्सर निर्माण करणारे तत्वांविरोधात लढतात आणि याने गंभीर आजारांपासून बचाव होतो.
6) हाडे होतात मजबूत
ल्यूटिन असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने हाडांचं आरोग्यचलं होतं. याने तुमची हाडे मजबूत होतात आणि हाडांचा आजार ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) चा धोकाही कमी करतात.