- मयूर पठाडेफिट आणि फाइन राहायचं तर वर्कआऊट करायलाच पाहिजे, घाम गाळायला आणि कॅलरीज जाळायलाच पाहिजेत. तुमचं आरोग्य उत्तम ठेवण्यातली ही पहिली पायरी आहे. कोणालाही ही चुकत नाही, पण तेवढंच पुरेसं नाही.अनेक जण विचार करतात, आपण इतका वर्कआऊट करतोय, इतका घाम गाळतोय, आता आपण काहीही खाल्लं तरी चालेल. कोणत्याही पदार्थावर, कितीही ताव मारता यईल. थोड्या फार प्रमाणात तुम्हाला असं वागता येणं शक्य आहे, क्षम्य आहे, पण त्याचा अतिरेक केला, तर तो आपल्याच अंगाशी येईल.व्यायाम, वर्कआऊट याच्या जोडीला एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे वर्कआऊटच्या माध्यमातून जेवढ्या कॅलरीज आपण जाळतो, त्यापेक्षा कमी कॅलरीज आपल्या शरीरात गेल्या पाहिजेत. मात्र त्याचवेळी हेही पाहिलं पाहिजे की आवश्यक तेवढ्या कॅलरीज आपल्या शरीरात जाताहेत की नाहीत? आपल्या शरीराच्या योग्य पोषणासाठी आवश्यक तेवढ्या कॅलरीज आपण घेतो आहोत की नाही? या कॅलरीजचं प्रमाण जास्त तर व्हायला नकोच, पण खूप कमीही व्हायला नको. नाहीतर तुमच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणामच जास्त होईल.त्यामुळे आरोग्याचं एक सूत्रही इथे लक्षात ठेवायला हवं, कॅलरीज जाळायलाच हव्यात, पण आहारातून आपल्या शरीरात येणाºया कॅलरीज जळणाºया कॅलरीजपेक्षा कमी, पण फार कमीही असायला नकोत.व्यायाम आणि आहार या द्विसुत्रावर आपल्या शरीराचा तोल मुख्यत्वे सांभाळला जातो याकडे आपलं लक्ष असायलाच हवं.
तुम्ही रोज किती कॅलरीज जाळता आणि किती कॅलरीज सेवन करता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 5:37 PM
त्याचं योग्य सूत्र माहीत असेल, तर तुम्ही राहाल ठणठणीत!
ठळक मुद्देवर्कआऊटच्या माध्यमातून जेवढ्या कॅलरीज आपण जाळतो, त्यापेक्षा कमी कॅलरीज आपल्या शरीरात गेल्या पाहिजेत.मात्र त्याचवेळी हेही पाहिलं पाहिजे की आवश्यक तेवढ्या कॅलरीज आपल्या शरीरात जाताहेत की नाहीत?व्यायाम आणि आहार या द्विसुत्रावर आपल्या शरीराचा तोल मुख्यत्वे सांभाळला जातो.