Fenugreek Seeds Water : मेथी एक असा मसाला आहे जो भारतीय किचनमध्ये असतोच. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. मेथीचं पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यासोबतच पोटासंबंधी अनेक समस्याही दूर करण्यास मदत मिळते. बरेच लोक रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचं पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, यापासून अधिक फायदा मिळवण्यासाठी या पाण्याचं किती दिवस सेवन करावं. तेच जाणून घेऊ.
मेथीतील पोषक तत्व
मेथीमध्ये सोडिअम, झिंक, फॉस्फोरस, फॉलिक अॅसिड, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअमसारखे मिनरल्स आणि व्हिटॅमिन ए, बी आणि सी आढळतात. त्याशिवाय यात भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, स्टार्च, शुगर, फॉस्फोरिक अॅसिडही असतं. या तत्वांनी शरीराला अनेक फायदे मिळतात.
मेथीच्या पाण्याचं सेवन करण्याचे फायदे तर तुम्हाला माहीत असतीलच. पण तुम्हाहा हेही माहीत असेल की, कोणत्याही गोष्टीची अति ही महागात पडत असते. हे मेथीच्या पाण्याबाबतही लागू पडतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं सेवन प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे. अशात मेथीच्या पाण्याचं सेवन किती दिवस करावं हे जाणून घेऊ.
मेथीचं पाणी किती दिवस प्यावे?
एक महिन्यांपर्यंत लागोपाठ मेथीचं पाण्याचं सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल केली जाऊ शकते.
तसेच एक महिना मेथीचं पाणी प्यायल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.
एक महिना मेथीच्या पाण्याचं सेवन केल्याने शरीरात गुड कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढून बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते.
तसेच एक महिन्या मेथीच्या पाण्याचं सेवन केल्याने ब्लड सर्कुलेशनही चांगल्या पद्धतीने होतं.
मेथीच्या पाण्याचे फायदे
बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथी 2 ग्लास पाण्यात टाकून पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत पाणी उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट याचं सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल.
फुप्फुसाची समस्या होते दूर
त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे मेथीच्या पाण्याने फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावं.