शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

आंबा गोड लागला म्हणून सारखा खात असाल तर हे वाचाच, जाणून घ्या एकावेळी किती आंबे खावेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 5:06 PM

आज आम्ही तुम्हाला जास्त प्रमाणात आंबे खाल्यास त्याचे काय परिणाम (What Is The Effect Of Eating Too Much Mango?) होऊ शकतात आणि एकावेळी किती आंबे (How Many Mangoes Can Eat At A Time) खावे याबद्दल माहिती देणार आहोत.

हंगामी फळांचे (Seasonal Fruits in diet) सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा (Mango nutrition value) हे उन्हाळ्यातील आपल्या सर्वांचे आवडते फळ आहे. क्वचितच लोक असे असतील ज्यांना आंबा खाणे आवडत नाही. चवीला उत्तम असणाऱ्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A), व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6), व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि फायबर (Fiber) भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय प्रथिने (Protein), कार्बोहायड्रेट (Carbohydrates), फॅट्स (Fats) आणि पोटॅशियम (Potassium) देखील असते. आंब्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट (Saturated fats) आणि सोडियमचे (Sodium) प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते एक सुपरफ्रुट (Mango Is Known As Superfruit) म्हणून ओळखले जाते.

आंब्याच्या चवीमुळे लोक खूप आंबे खातात. मात्र आंबा हे उन्हाळ्यातील हंगामी फळ असले तरी ते प्रमाणात खाणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला जास्त प्रमाणात आंबे खाल्यास त्याचे काय परिणाम (What Is The Effect Of Eating Too Much Mango?) होऊ शकतात आणि एकावेळी किती आंबे (How Many Mangoes Can Eat At A Time) खावे याबद्दल माहिती देणार आहोत.

जास्त प्रमाणात आंबा खाण्याचे दुष्परिणाम...

- आंब्याचे गुणधर्म उष्ण असल्यामुळे शरीरातील उष्णता वाढून त्वचेवर पिंपल्स, येण्याच शक्यता असते.

- कच्चा आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

- जास्त प्रमाणात आंबा खाल्याने पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.

- काही लोकांना आंब्याच्या अतिसेवनामुळे अ‍ॅलर्जी किंवा घसा खवखवण्याची समस्या होऊ शकते. आंब्याचा वरचा भाग व्यवस्थित साफ न केल्यास किंवा आंबा कापताना त्याचे दूध काढले गेले नाही तर यामुळे घसा खवखवण्याची समस्या उद्भवते.

- ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आंब्याचे सेवन करावे.

- गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आंब्याचे सेवन करावे.

- प्रमाणापेक्षा जास्त आंबे खाल्ल्याने वजन वाढणे आणि मधुमेह या दोन्हींचीही शक्यता संभवते.

- कच्चा आंबा खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळावे. कारण आयुर्वेदानुसार हे मिश्रण योग्य नाही.

- रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे खाल्ल्याने तुमच्या शरीरास ते अपायकारक ठरू शकतात.

प्रमाणात खावा आंबाआंबा हे एक उष्ण फळ आहे. त्यामुळे तुम्ही आंब्याचे प्रमाणात सेवन केले तर यामुळे काहीही नुकसान होत नाही. मात्र आंबा खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, तसेच त्वचेवर अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे एका दिवसात 2 पेक्षा जास्त आंबे खाऊ नये. तसेच आंबे खाण्यापूर्वी ते किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावे. यामुळे आंब्याची उष्णता कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आंबा कोणत्या वेळी खावा असाही प्रश्न अनेक जणांना पडतो. तर आंबा खाण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याची वेळ. यावेळी आंबा खाल्ल्याने शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते. कारण आंबा आपल्या शरीरातील क्षार भरून काढतो आणि दिवसभर आपल्याला उत्साही राहण्यास मदत करतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स