पैसे देऊन जीममध्ये व्यायामाला जायचंय?- तर सर्वांत उत्साहाने पुढे असलेल्यांमध्ये भारतीयांचे नाव अग्रभागी असल्याचा एका पाहणीचा ताजा निष्कर्ष आहे. भारतात एकूणच पैसे भरून व्यायाम शिकवणाऱ्या, त्यासाठीची साधने पुरविणाऱ्या जीमची संस्कृती तशी नवी असली, तरी आपल्या देशाच्या तुलनेत बाकी जगभरात जीमचे पैसे भरले, तरी प्रत्यक्ष जीममध्ये जाऊन घाम गाळण्याच्या बाबतीत लोक तसे आळशीच दिसतात. फ्रान्समध्ये तर जेमतेम ४ टक्के लोकांनीच जीमच्या मेम्बरशिपचे पैसे भरल्याचं सांगितलं. भारत, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये जीम संस्कृती रुजलेली दिसते.
गेल्या वर्षभरात किती लोकांनी जीमचे पैसे भरले?(पाहणीत सहभागी झालेल्या नागरिकांची टक्केवारी)